(विरुर,गाडेगाव येथील वेकोली प्रशासनाने पाडावयास लावलेले घर) |
आवाळपुर(खबरबात) :-
विरूर ( गाडेगाव) हे गाव वेकोली खाणी मुळे प्रसिद्धीस आले असले तरी समस्या च्या डोंगरांमुळे गाडेगाव वासीय हैराण असून वेकॉली प्रशासनाचा मनमानी कारभरामुळे गावकरी त्रस्त झाल्याचे चित्र आहे.
गाव वेकोली मुळे प्रसिद्धीस आले असले तरी समस्या मात्र कायम आहे. गाव हे वेकोली प्रशासनाच्या दत्तक गावामध्ये येत असून अजूनही पाहिजे त्या प्रमाणात गावाचा विकास झालेला नाही. उलट समस्यांचा डोंगर वाढतच आहे.
पुनर्वसन करण्याची मागणी
पैनगंगा वेकोलीला 6 ते 7 वर्षा झाले आहेत. अनेकांची शेती गेली अनेकांना आर्थिक मोबदला सुद्धा मिळाला परंतू गावातील समस्या सुटेनासे झाल्या आहेत.त्यातील महत्वाची समस्या म्हणजे गावाचे पुनर्वसन वर्शो लोटत असले तरी गावाचे पूर्णवसन करण्यात आले नाही. जागा दिली मात्र त्यावर अजूनही बांधकाम करून देण्यात आले नाही. त्यामुळे गावकरी प्रशासनाचा या धोरनावर रोष व्यक्त करीत असून पूर्णवसानाची मागणी केली आहे.
खदानीचा गावाला फटका
वेकोली सुरू झाली त्यातच खदानीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली त्याचा फटका देखील गवतील नागरिकांना होत आहे. रोज होत असलेल्या खदानीचा ब्लास्ट मुळे गाव दनानल्या जात आहे एवढेच नहीं तर रोजच घरातील भांड्याचा आवाज येत आहे. खदान दिवसेंदिवस गावालगत येत असल्याने त्याचा फटका मानवा सोबत त्यांचा घरालाही भेगा पडल्याचे निदर्शनास येत आहे.
वेकोली प्रशासन आपली मनमानी कारभार सुरू असून गावातील संपती मालमत्ता हस्तगत केली आहे. मात्र 2019 - 20 कर ग्रामपंचायतला जमा करायचा असतो तो मात्र त्यांनी ग्रामपंचायत ला जमा न करता गावातील नागरिकांना थेट चेकद्वारे रक्कम वितरित करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून वेकोली प्रशासनाने मुजोरी सुरू असून काही लोकांचे घर पाळावयास लावले दहा महिने लोटून सुद्धा त्या घर पाळणाऱ्या नागरिकांना अजूनही वेकोली प्रशासनाने रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.2019 - 20 चा कर न भरता उलट त्यांनी शासकीय इमारतीचे नमुना 8 अ मागितले आहेत. यासाठी ग्रामपंचयत प्रशासनावर दबाव तंत्र वापरल्या जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा कडे निवेदन सुधा सादर केले आहेत.
गावातील काही घर पाडण्यात आले त्यांना आर्थिक सहाय्य करून गावाचे हित लक्षात घेता लवकरात - लवकर पुनर्वसन करावे.वेकोलि प्रशासनाने 2019 20 चा कर भरणा करूनच इतर दस्तऐवज ची मागणी करावी.
(सुभाष रघुनाथ दाळे, सरपंच ग्रामपंचायत विरूर ( गाडेगाव)
Covid-19 च्या धरतीवर रेपोली प्रशासनाची जावा जावी सुरूच असून तेथील काही कर्मचारी तसेच जड वाहतूक चालक गावात फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वेकोलि प्रशासनाच्या कर्मचारी व इतर नागरिकांनी भटकू नये तसेच आवाज झाली सुरू आहे ती बंद करावी व गावाचे हित लक्षात घेता गावाचे पुनर्वसन करावे.
(संतोष मडावी, पोलीस पाटील. विरूर ( गाडेगाव)
( वेकोली प्रशासनाचा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता. संपर्क होवू शकला नाही)