वन, वन्यजीव यांच्या संरक्षणा बरोबरच वन विभागाचे कर्मचारी करतात कोरोना विषयी जनजागृती
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 19 एप्रिल 2020.
नवेगावबांध:-वन विभाग(प्रादेशिक) गोंदिया अंतर्गत नवेगाव बांध उपविभागांतर्गत वनक्षेत्र नवेगाव बांध, गोठणगाव, अर्जुनी मोरगाव, चिचगड या वनक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या आदिवासी, दुर्गम,नक्सलग्रस्त गावात वन व वन्यजीव यांच्या संरक्षणा बरोबरच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोना या जागतिक महामारी विषयी व कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत जनजागृती करीत आहेत. नवेगाव बांध उपविभाग अंतर्गत नवेगाव बांध वनक्षेत्रात पवनी, कवठा, बाराभाटी नवेगावबांध सहवनक्षेत्रा तील अंतर्गत येणाऱ्या गावात वन अधिकारी व वनकर्मचारी वनाचेवन्यजीवांचे संरक्षण ,वनाचे आगीपासून रक्षण, वन्यप्राण्यांच्या शिकारी याबाबत जनजागृती करीत असताना कोरोणा विषयी सुद्धा काही गीताद्वारे तर काही संदेशाद्वारे जनजागृती करीत आहेत. उपविभाग नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी दा.वी. राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी एन. के. सरकार, ललितअग्निहोत्री,बहुरे,संजय शेंडे, नवेगावबांध वनपरिक्षेत्रात नवेगाव बांध(प्रादेशिक)प्रमोद मेश्राम वनरक्षक,कु. वृशाली वानखडे वनरक्षक,कु. मोनाली रंगारी वनरक्षक,
कु सारिका नागपुरे वनरक्षक,वाहन चालक धार्मिक
वनविभाग गोंदिया वनपरिक्षेत्र नवेगाव बांध ( प्रादेशिक) मार्फत वन्यजीव व वनांचे संरक्षण तसेच कोरोना विषाणू बद्दल जनजागृती करीत आहेत. आपल्या शेतात विद्युत तारा वापरून विद्युत प्रवाह सोडून वन्य प्राण्याची शिकार करणे, वनामध्ये जाऊन शिकार करणे शिकार करण्याचा प्रयत्न करणे. वन्य प्राण्यांच्या मासांचे विक्री करणे वन्य प्राण्यांचे अवयव स्वतः जवळ बाळगल्यास. भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. तसेच वनामध्ये प्रवेश करून अवैध वृक्षतोड केल्यास भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये कारवाई करण्यात येईल. वनांमध्ये आग लावल्यास, विस्तव पेटवल्यास, वनात नेल्यास, दक्षता न घेता विस्तव पेटवल्यास, वनात जळता विस्तव सोडल्यास ,भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये एक वर्षाचा कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याबरोबरच सामाजिक अंतर पाडा, घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना नाका तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून बाहेर पडावे ,साबणाने 20 सेकंद पर्यंत हात धुवावे. अशा प्रकारची कोणाविषयी जनजागृती वन विभागाच्या वतीने गावा गावात केली जात आहे. कवठा सहवन क्षेत्रातील वनरक्षक प्रमोद मेश्राम हे कोरोना जागृती गीतातून दुर्गम, आदिवासी भागातील नागरिकांना घराबाहेर पडू नका. अशा प्रकारची थेट हृदयाला हात घालणारी आर्त हाक देऊन संदेश देत आहेत. एक खाकीवर्दी लॉकडावून व संचारबंदी नियमांची अंमलबजावणी करताना दिसते, तर दुसरी खाकीवर्दी वन व वन्यजीव सरंक्षण याबरोबरच खेड्यापाड्यात आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात कोरोना विषयी जनजागृती करताना दिसत आहे.