भाजपा वाडी शहरचा स्त्युत्य उपक्रम
नागपूर:अरूण कराळे:
आमदार समीर मेघे यांच्या मार्गदर्शनात वाडी शहरातील कोणताही गरजू व्यक्ती या बंदीच्या काळात उपाशी राहू नये या भावनेतून १४ एप्रिल पर्यंत दररोज सकाळ ,संध्याकाळ भोजन देण्याची व्यवस्था वाडीतील गुरू अमरदास गुरुद्वारा येथे केली असून गरजूंच्या घरापर्यंत पोहचविण्याचे कार्य वाडी शहर अध्यक्ष केशव बांदरे,नरेश चरडे ,राकेश मिश्रा ,दिनेश कोचे ,कमल कनोजे ,मनोज रागीट ,चंद्रशेखर देशभ्रतार , अक्षय तिडके ,पुरुषोत्तम लिचडे ,नितीन अन्नपूर्णे , देवेंद्र बोरीकर ,रामेश्वर बागडे ,विपीन खेडेकर ,मयंक रागीट,मनीष बागडे , जनकताई भोले ,ज्योती भोरकर , कल्पना सगदेव ,सरीता यादव ,शालीनी रागीट ,आशा कडू ,रामेश्वर बागडे ,विपीन खेडेकर ,मयंक रागीट,मनीष बागडे ,योगेश शेंडे ,छोटू मेंढे तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या माध्यमातून सुरू आहे.
चायना निर्मित कोरोना विषाणू जगासाठी भारी पडला आहे .यावर रामबाण उपाय करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केले. यामुळे आपल्या भारतीयांना कोरोना पासून संरक्षण मिळाले आहे. या स्थितीत काहीं गरीब मजुरांना मात्र रोजगाराला मुकावे लागले. भारतात आजही बहुतांश मंडळी हातावर आणतात आणि पानावर खातात अशीच त्यांची अवस्था आहे .अशा कुटुंबांची संख्या वाडीत मोठ्या प्रमाणात आहे .काही मजूर वर्गाना लॉकडाऊन च्या काळात उपाशी राहण्याची पाळी येऊ नये म्हणून आमदार समीर मेघे यांनी पुढाकार घेत दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे .लॉकडाऊनचा काळ एकवीस दिवसाचा आहे अजून आपल्याला तेरा दिवस काढायचे आहे.या काळात उपाशीपोटी राहण्याची वेळ वाडीतील मजूर व कामगारांवर आली होती. त्यामुळे मजूर वर्गाची चूल चायनाच्या कोरोनामुळे विझली आहे. त्या लोकांच्या पोटाची काळजी घेत हा उपक्रम सुरू केला आहे असे मनोगत आ. समीर मेघे यांनी व्यक्त केले . समाजभान जपणाऱ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे.