नागपूर : अरूण कराळे:
विषाणू पासून वाचण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून वारंवार घरी पाण्याने हात धुता येईल,तसेच घरातील कापडाचा वापर मास्क म्हणून करता येईल.आम्हाला सॅनिटायझर,मास्कची गरज नसून लेकरांची पोटाची भूक भागविण्यासाठी आम्हाला आतातरी अन्न-धान्याची नित्यांत गरज असल्याचे केविलवाणी मांगणी लॉक -डाऊन मध्ये सापडलेल्या गरीब मजुरांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडे केली.
वाडी-दाभा परिसरात रोजमजुरीचे काम करण्यासाठी आलेले छत्तीसगढ, मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,बिहार तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून कामगार वर्ग आला असून अचानक देशात लॉक-डाऊन झाल्याने अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी दाभा मैत्र ग्रुपचे ज्ञानेश्वर बारंगे,संजय विश्वकर्मा,अमित शुक्ला,योगेश ठाकरे,येशूलाल डहरवाल,राखी शिंगारे, जितू शर्मा यांनी परिसरातील रोजमजुरीचे काम करणाऱ्यांना कामगारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे,नाव,नंबर नोंदवून दररोज कमीतकमी १५० लाभार्थ्यांना धान्य व किराणा सामानाचे वितरण बाळाभाऊ पेठ दाभा येथून एक मीटर अंतरावर उभे ठेवत केल्या जात आहे.आजपावेतो जवळपास १५०० लोकांना याचा लाभ मिळाला असून लॉक-डाऊन संपेपर्यंत हे सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचा कार्यकर्त्यानी संकल्प केलाआहे.