जुन्नर /आनंद कांबळे:
हरविलेल्या सिम कार्डची पोलीसांकडे तक्रार न दिल्याने थेट दिल्ली येथील निजामुद्दीन मरकल प्रकरनाशी संबधीत असल्याचे शासकीय माहितीवरून जुन्नर मधील एका युवकाला पुणे येथे नायडु हॉस्पिटलमध्ये कोरोना संशयित रुग्ण म्हणून जाऊन तपासणी करावी लागली. तपासणी नंतर या युवकाला घरी सोडण्यात आले.
परंतु निजामुद्दीन मरकल प्रकरणाशी दुरानवये संबध संबध नसताना सिमकार्ड हरविल्याची तक्रार न केल्याने या युवकाची परवड झाली. करोना रोगावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासन अगदी बारकाईने नियोजन करत असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. दिल्ली येथे निजामुद्दीन मरकल मध्ये सहभागी झालेल्याची शासनाकडुन तपासणी होत आहे.
जुन्नर मधील एका युवकास दिनांक 1 रोजी यांच्याकडून शासनाने दिल्ली निजामुद्दीन मरकल संदर्भात संशयितांची जी यादी प्रसिद्ध केली आहे त्यात मोबाईल नंबर असल्याने तुझा संबध काय अशी चौकशी पोलीस व महसुल यंत्रनेने केली. शासनाने दीलेल्या यादीत जो नंबर आला आहे तो माझा पुर्वीचा नंबर होता. मागील वर्षी या नंबरचे सीम कार्ड माझ्याकडून हरविले .सिम कार्ड हरविल्याची तक्रार मी पोलिसांकडे केलेली नव्हती .
आता दिल्ली येथील ज्या व्यक्तीकडे हे सिम कार्ड आहे असे समजते ती व्यक्ती यापूर्वी जुन्नर येथे एका हॉटेलमध्ये कामास होती व सध्या ही व्यक्ती दिल्ली येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.
दिल्ली येथील कार्यक्रमात संबधित व्यक्ती फोटो काढण्यासाठी हा गेला असल्याचा कयास आहे .जुन्नर मधील युवकाचे सिमकार्ड या व्यक्तीकडे गेले असावे व या व्यक्तीने सिमकार्ड मूळ मालकाच्या नावावरच ठेवून आहे तसेच वापरलेे असावे. असाही संशय आहे.