कोरोना या संसर्गजन्य महामारिच्या संकटाने सर्वत्र थैमान घातले आहे, बामणी, बल्लारपूर येथेही लॉकडाउन आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-यांपुढे बेरोजगारीचे संकट ओढवल्याने पोटापाण्याचे संकट निर्माण झाले आहे. मुलाबाळांसाठी जेवायची सोय नाही.अश्या कुंटुंबांना डॉ. अंजली साळवे यांनी योग्य समन्वय आणि व्यवस्थापन कौशल्याच्या माध्यमातून किराणा व धान्याची सोय थेट नागपूरवरून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी (दुधोली) या गावात करुन दिली.
चंद्रपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बल्लारपूर येथील बामणी (दुधोली) गाव, या गावातील काही परिवारांना अन्न-धान्याची कमतरता पडत आहे. अशी माहिती डॉ.ऍड अंजली साळवे यांना फोनवरून मिळाली. संचारबंदी असल्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणे शक्य नव्हते,अश्यात तत्काळ आपल्या संपर्कातील काही लोकांना या मदतीसाठी हाक दिली. अन एका फोनवर धडा-धड मदतीसाठी लोक उतरले.
डॉ.ऍड अंजली साळवे यांच्या आवाहनाला बऱ्याच जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ह्यात बल्लारपूरचे डॉ श्रीनिवास यांनी किराणा व धान्याच्या किट त्वरीत उपलब्ध करून दिल्या. आणि डॉ. साळवे यांनी त्या किट्स बामणी येथील तरुणांच्या माध्यमातून गरजवंतापर्यंत पोहचविल्या व हे मदतीचे सत्र सुरू झाले.कितीही अडचण असली आणि मदत करायची मानसिक इच्छा असली तर दूर राहून सुद्धा मदत पोहचविता येते. याचा प्रत्यय डॉ ऍड अंजली साळवे यांनी आपल्या कृतीतून दर्शविला आहे.
राष्ट्रीय पातळीवर डॉ. साळवे यांच्या कामाचा अनुभव सर्वश्रृत आहे,महिला बालकल्याण असो की ओबीसी जनगणना अश्या बऱ्याच सामाजिक विषयात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव त्यांनी अनेकदा गौरन्वित केले आहे.
कोरोनाच्या या संकटात विविध संघटनाकडून गरजू लोकांना विविध ठिकाणी मदत पोहचविण्याचे काम सुरू असतानाच आपल्या बामणी (दुधोली) या पैतृक गावातील काही कुटुंबाना मदतीची गरज असल्याची माहिती नागपूर येथे मला मिळाली.
तत्काळ मी गावातील सचिन बरडे ,सरल फाऊंडेशन बामणी व टीम ह्यांच्या संघटने सोबत समन्वय साधून तेथील सत्य परिस्थिती जाणून घेतली, व या कुटूबांना मदत उपलब्ध करुन देण्याचे आवाहन बल्लारपूर येथील डॉ. डॉ श्रीनिवास थोटा ,अध्यक्ष, जेसीआय बल्लारपूर पेगसस,आणि जेसी श्री आर के शुक्ला, जेसी श्री सलमान आणि टीम समविचारी लोकांना केले होते. यांच्या मार्फतकाही तासातच गावकऱ्यांना मदत मिळाली, प्रत्येक गरजूंना अन्नधान्य वाटले गेले. गावकऱ्यांनी देखील मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.गरजूंना मदत मिळाली याचे मला आनंद आहे.
डॉ. श्रीनिवास |

डॉ.ऍड अंजली साळवे.