चंद्रपूर/ प्रतिनिधी
ग्रीन झोन मधील जिल्हा बंदी कायम ठेवत 20 एप्रिलपासून जिल्ह्यातील "संचारबंदी शिथिल" होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी
आज उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली. झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील बंद असलेले उद्योग सुरू करण्याची त्यांना विनंती केली असता जिल्ह्यातील उद्योग Covid19 चे सर्व नियम पाळून सुरू होण्याचे संकेत मा. अजितदादांनी दिले.
उद्या तसे आदेश निघणार आहेत, असा विश्वास राजेंद्र वैद्य यांनी फेसबूकवर दिलेल्या माहितीतून व्यक्त केला आहे.