जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या अहीरांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करा
रामू तिवारी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
चंद्रपूर :- कोणते संविधानीक पद नसताना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या खुर्चीवर बसून बैठक घेणाऱ्या हंसराज अहिरांवर कारवाई करण्याची मागणी रामू तिवारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
14 मार्च 2020 रोजी माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बैठक घेतली. हंसराज अहिर यांच्याकडे कोणतेही संविधानीक पद नसून ते फक्त सामान्य नागरिक आहे. तरीदेखील ते चक्क जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीवर बसून अधिकार्यांना जाब विचारत असल्याचे वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यातील फोटोमध्ये दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्या खुर्चीचा अवमान आहे. त्यामुळे खुर्ची देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक, अधिकारी व खुर्चीवर बसणारे हंसराज अहिर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रामू तिवारी यांनी केली आहे.