डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 1956 च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजक व दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर चे सचिव, माजी उपमहापौर सदानंदजी फुलझेले ह्यांचे आज 15 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांच्याच धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले.
सदानंद फुलझेले हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज सकाळी ९.३० वाजता धरमपेठ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फुलझेले यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. फुलझेले नागपूरचे उपमहापौर होते. तसेच रामदासपढ वॉर्डाचे नगरसेवकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे ते आयोजक होते. तसचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते सचिव होते.