सोनबा बाबा यात्रेवर कोरोनाचे सावट,जिल्हाधिकारी यांचे समितीला पत्र
पंचकमिटीचा निर्णय:पूजा-महाआरतीने होणार सांगता,इतर कार्यक्रम स्थगित
नागपूर: अरूण कराळे
नागपूर तालूका अंतर्गत येणाऱ्या वाडी-खडगांव मार्गावरील लाव्हा येथे रंगपंचमी निमित्त सोनबा बाबा उत्सव परंपरेनुसार बैलविना बंड्याअंदाजे मागील २०५ वर्षांपासून स्थानिक गोरले कुटुंबियांच्या वतीने माधोवराव गोरले(वय ८५ )यांनी ही परंपरा कायम ठेवली असून दरवर्षी या उत्साहाचे आयोजन करण्यात येते.उत्साहात अंदाजे १० ते १५ हजार भाविक आपली हजेरी लावतात.परंतु कोरोना संसर्गजन्य रोगामुळे शनिवार १४ मार्च रोजी होऊ घातलेल्या यात्रेवर या रोगाचे सावट पसरले आहे.जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त होताच यावर्षी सोनबा बाबा उत्सव समितीचे वतीने परंपरागत पद्धतीने फक्त पूजा-महाआरती करून लोककला अंतर्गत दिवसभर चालणार खडा तमाशा,कव्वाली व इतर कार्यक्रमही स्थगित करण्याचा निर्णय पंचकमेटीने घेतल्याने दरवर्षीप्रमाणे बैलाविना चालणाऱ्या बंड्यानाही ब्रेक लागणार आहे .
चीन मधील वुहान या शहरामध्ये करोना विषाणूजन्य आजाराचे रुग्ण प्रथमतः निदर्शनास आले आहेत.या आजाराचा पादुर्भाव आपल्या देशासह इतर देशात सुद्धा झालेला आहे.या पार्श्वभूमीवर भारत सरकारने बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिग सुरू केले आहे.हा आजार आपल्या जिल्ह्यात पसरू नये या दृष्टीने यात्रा समिती प्रबंधक समिती व्यवस्थापनाला जिल्हाधिकारी नागपूर यांनी पत्र पाठवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्याने यावर्षी पंचकमेटीने याआदेशाचे तंतोतंत पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. बैलाविना धावणारी बंडी व सांस्कृतीक कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे व्याहाड आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यपाल वैद्य यांनी ग्रामपंचायत लाव्हा येथे बैठकीत निर्देश केले आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीत गोरले परिवाराचे सातव्या पिढीतले वारसदार यांनी देखील सकारात्मक समर्थन दिले आहे.
यावेळी सोनबा बाबा उत्सव पंचकमेटीचे अध्यक्ष गणेश पटेल हिरणवार,सरपंच ज्योत्स्ना नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे,जि.प. सदस्या ममता धोपटे,माजी उपसभापती सुजित नितनवरे,माजी उपसरपंच रॉबिन शेलारे,सचिव विकास लाडे,पांडुरंग बोरकर,देवनाथ गोरले, यादव इंगळे, महादेव वानखेडे, बबन वानखेडे,रामकृष्ण धूर्वे,सतिश तभाणे ,गजानन गोरले,राजन हिरणवार,प्रकाश डवरे,मंगेश चोखांद्रे,अनिल पाटील,साधना वानखेडे,सुशीला ढोक,मनोज तभाने,मंजुषा लोखंडे,सुनीता तोंडासे,पुरुषोत्तम गोरे,रेखा पटले,प्रशांत परिपवार,जया पिचकाटे उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाने या आजाराला घाबरून न जाता काळजी कशी घ्यावी याबाबतचे सूचना फलकाचे होर्डिंग लावून लोकांना जाहीर आव्हान केले आहे.