ओबीसी अस्मिता रथयात्रेला सावली तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
सावली /प्रतिनिधी:
ओबीसी अस्मिता रथयात्रा सावली तालुक्यात आगमन झाल्यावर शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रथयात्रेची मुख्यमार्गाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचे नेतृत्वात सुरवात करण्यात आली,
मंडळ आयोगा नुसार देशात 3743 जाती समुह असल्याचे स्पस्ट होत आहे, सन 1931 मद्ये ओबीसी ची इंग्रजांच्या काळात जनगणना झाली तेव्हा 52% इतका जनसमूह ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होता, जर 2021 मध्ये ओबीसी ची स्वतंत्र जनगणना झाल्यास नक्कीच 70% जनसमुह ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असू शकतो, या संपूर्ण ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणना झाली तरच ओबीसी प्रवर्गातील जातीचा विकास होईल, अन्यथा ओबीसी प्रवर्गातील जातीवर फार मोठा अन्याय होईल व भारत स्वतंत्र झाल्यापासून होत आहे,
त्यामुळे 1 मे पासून सुरु होणाऱ्या जनगणना फार्मेट मध्ये ओबीसी चा स्वतंत्र रकाना नसल्यमुळे संपूर्ण ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जनतेनी जनगणना करण्यास स्पष्टपणे नकार देऊन कोणतीही माहिती देऊ नये, यावेळी आपण सर्व ओबीसी प्रवर्गात मोडण्यात जातीने एकसंघ होऊन बहिष्कार टाकावा असे प्रतिपादन मा सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी आव्हान केले,
ओबीसी जनगणना अस्मिता रथ यात्रा 2 मार्च 2020 पासून संपूर्ण जिल्हाभर जनजागृती करण्याकरिता निघाली असून ती अस्मिता रथ यात्रा आज दि 13/3/2020 सावली येथे आगमन होताच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मा सचिन राजूरकर यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आली, त्या नंतर नियोजित गावांना कवठी , उसेगाव, हरांबा, कापसी, व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, निमगाव, अंतरगाव, निफंद्रा, गेवरा बुज, पालेबारसा व पाथरी येथे भेटी देऊन पत्रके देऊन जनगणने संदर्भात माहिती देण्यात आली सर्व ठिकानी जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यानंतर ठिक 7:30 वाजता बाजार चौक पाथरी येथे मा सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांचे अध्यक्षतेखाली मा. श्याम लेडे यांच्या विशेष उपस्थितीत समारोपीय जाहीर सभा घेण्यात आली, त्या सभेत मा. अविनाश पाल, मा. दिनेश चिटनुरवार, डॉ. तुषार मर्लावार , मा. विजय कोरेवार सभापती, कविंद्र रोहणकर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली तालुका, आदि उपस्थित होते, तसेच सभेला बहुसंख्ये महिला व ओबीसी बांधव उपस्थित होते.