चंद्रपूर/प्रतिनिधी:
विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पवनकुमार निवाते याला १ हजार ५०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई ५ मार्चला करण्यात आली.
तक्रारदार हे राजुरा येथील रहिवासी असून यांचे सायकल पंच्चरचे दुकान आहे.सदर दुकानात नविन विद्युत पुरवठा कनेक्शन देण्याच्या कामाकरीता राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यकअभियंता पवन कुमारनिवाते यांनी स्वत: करीता त्यांचे कार्यालयातील खाजगी सुरक्षागार्ड संजय खोब्रागडे यांचे मार्फत लाच म्हणून १५०० रुपये मागणी केली.
तक्रारदार यांची सहाय्यक अभियंता पवनकुमार निवाते वखाजगी सुरक्षा गार्ड संजय खोब्रागडे यांना लाच देण्याची त्यांची मुळीच ईच्छा नसल्याने
त्यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबिंधक कार्यालय चंद्रपूर येथे तक्रारदाराने तक्रार दिली. यातक्रारी वरून दि. ४ मार्च व दि.५ मार्च रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये सहाय्यकअभियंता पवनकुमार निवाते व
खाजगी सुरक्षा गार्ड संजय खोब्रागडे यांचे कडून लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने राज्यविद्युत वितरण कंपनी राजुरा कार्यालयात पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यानआरोपी क्र.१ पवन कुमार हिरालाल निवाते, (३३)सहाय्यक अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी राजुरा यांनीआरोपी क्र. २ संजय गोंविदा खोब्रागडे यांचे मार्फत १५०० रु.लाच रक्कम स्विकारल्याने
त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.