चंद्रपूर/प्रतिनिधी:
आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत बोलतांना चंद्रपूरातील विविध प्रश्नांना स्पर्श केला. चंद्रपूर शहर महानगरपालिका संपन्न असून मनपा आस्थापनाचा खर्च ३५ टक्के पेक्षा कमी आहे. त्यामूळे येथील कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी आ. जोरगेवार यांनी केली. चंद्रपूरातील वन अकादमीच्या दुस-या टप्पाचे काम सुरु करावे अशी मागणीही विधानसभेत बोलतांना आ. जोरगेवार यांनी केली.
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या दर्शनाला चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भ, मराठवाडा यासह लगतच्या राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने माता महाकालीच्या दर्शनाला चंद्रपूरात येतात या महाकाली मंदिराच्या जिर्णदधोराकरीता ६० कोटी रुपये मंजूर झाले असून हे पैसेही आलेले आहे. मात्र यात पूरातत्व विभागाची परवाणगी घेण्यात यावी अशी अट टाकण्यात आलेली असून पूरातत्व विभागाने येथील जिर्णदधोराची परवानगी नाकारली आहे. त्यामूळे पूरातत्व विभागाची ही अट रद्द करण्यात यावी अशी मागणीही यावेळी विधानसभेत बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
चंद्रपूरचा बहूतांश भाग हा नजूलच्या जागेवर बसला आहे. येथील नागरिकांना घरपट्टे देण्यात यावेत ही जूनी मागणी आहे. मात्र चंद्रपूरकरांना उद्याप तरी घरपट्टे देण्यात आलेले नाही. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय विधानसभेत मांडत चंद्रपूरातील नागरिकांना घरपट्टे देण्यात यावे अशी मागणी विधानसभेत केली आहे.
चंद्रपूरातील बहुतांश भाग हा नजूलच्या जागेवर बसला आहे असून जवळपास ६० हजार घरे नजूलच्या जागेवर आहे. लाखो रुपयांचे घर असूनही पट्टे नसल्यामूळे येथील नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनेच्या लाभापासून वंचीत राहावे लागत आहे.
घरकूल योजनेअंतर्गत अनेकांचे अर्ज स्विकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्यामूळे नजूल धारकांना या योजनेपासूनही वंचित राहावे लागले आहे. आता आमदार किशोर जोरगेवार यांनी घटपट्टे देण्यात यावे अशी मागणी विधानसभेत करत पून्हा एकदा हा विषय चर्चेत आणत नजूल धारकांच्या आशा पल्लवीत केल्या आहे. मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल मंत्री यांना उद्देशून चंद्रपूरकरांना घरपट्टे देण्याच्या दिशेने शासनाने त्वरीत निर्देश पारीत करावे अशी मागणी केली आहे.
या पूर्वीही जिल्हा आढावा बैठकीत आ. जोरगेवार यांनी चंद्रपूरकरांना घरपट्टे देण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री यांना केली होती. आता हाच विषय त्यांनी विधानसभेत मांडत चंद्रपूरच्या महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
विधिमंडळात उपस्थित सर्व महिला सदस्य दुसऱ्यांसाठी मागणी करत आहेत. महाराष्ट्र विधासभेच्या २८८ सदस्य संख्येमध्ये केवळ २४ महिला सदस्य आहेत.जागतिक महिला दिनी या २४ महिला सदस्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी विधिमंडळात केली. तसेच बिहार राज्याच्या धर्तीवर आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना सायकल दिली पाहिजे,निराधार महिलांना २ हजार रुपये मानधन दिलं पाहिजे व महिला सुरक्षिततेसाठी माता भगिनींच्या संरक्षणाची शपथ शाळा कॉलेजमध्ये घेतली पाहिजे अशी मागणी विधिमंडळात केली.