ललित लांजेवार/नागपूर:
नो पार्किंगमध्ये असणारी दुचाकी पोलिसांनी टोइंग गाडीत टाकल्याने एक ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती चक्क टोइंग वाहनाच्या समोर झोपल्याने चांगलीच खळबळ झाली.
हि घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नागपुरातील मानेवाडा चौकातील वर्धमान वाईन शॉपी समोर घडली,अजनी वाहतूक चेंबरमध्ये कार्यालयात सहायक पोलिस उपनिरीक्षक शालिक्रम हे पथकासह यांवर कार्यालयात होते मानेवाडा चौकातील वर्धमान वाईन शॉपी समोर एक अस्ताव्यस्त स्थितीत असणारी दुचाकी पोलिसांच्या फिरत्या पथकाने नो पार्किंग मधून गाडी उचलून वाहनात टाकली ही बाब वाहनचालकाला माहीत होताच ६० वर्षीय वाहनचालक ताबडतोब पोलीस वाहन समोर आले .
व गाडी खाली उतरवण्यात विनंती केली मात्र पोलिसांनी नो पार्किंगमध्ये गाडी असल्यामुळे जप्त केली, असेत्या वृद्ध व्यक्तीला सांगितले. मात्र विनंती करून पोलीस गाडी खाली उतरत नसल्याचे बघून हे 60 वर्षीय वृद्ध सर्व पोलीस गाडीच्या समोर रस्त्यावर झोपले.

मले माझी गाडी वापस पाहिजे म्हणजे पाहिजे ,असे म्हणत गाडी समोर झोपल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. यातच पोलिसांना हार मानत या वृद्ध व्यक्तीची गाडी परत करावी लागली ग मॅटर हलका करावा लागला.