नागपूर/खबरबात:
उलटी आल्याचं सोंग करुन सहप्रवासी महिलेचे दागिने चोरणारी महिला चोरट्यांच्या गँगला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे नागपुरात दागिने चोरण्यासाठी ही टोळी थेट वर्ध्यातून ऑटोने नागपुरात यायची.आणि रिक्षात सोन घातलेल्या महिलांना बसवून त्यांचे सोने लुटायची.
या प्रकरणात फिर्यादी 56 वर्षीय फिरोजा बेगम 26 फेब्रुवारी रोजी कुटुंबियांसाठी आवश्यक औषध घ्यायला इंदोरा परिसरात आल्या होत्या. औषध घेतल्यानंतर त्यांनी मंसुरी कॉलनीत जाण्यासाठी त्यांनी शेयर रिक्षा घेतली. ऑटो त्यांच्या जवळ थांबला त्या ऑटोत आदीच एक महिला बसली होती, याच महिलेले त्यांचा घात केला. थोडं अंतर गेल्यावर रिक्षामधील महिलेने उलटी आल्याचं सोंग केलं. महिलेला उलटी होत असल्याचं पाहून एकच गोंधळ माजविला तेवढ्यात ऑटो चालक चातुरीने ऑटो थांबवीतो मात्र उलटी अंगावर पडेल या भीतीने फिरोजा बेगम लगेच रिक्षाबाहेर उतरल्या आणि चोर चालकाने इतर सर्व प्रवाशांसह ऑटो समोर नेला. यानंतर फिरोजा बेगम यांनी गळ्याला हात लावल्यावर त्यांची दोन तोळ्यांची सोन्याची गोफ सोबतच्या महिला प्रवाशांनी पळवली असा संशय आला.
हि घटना घडल्यानंतर फिरोजा बेगम ह्या थेट जरीपटका पोलिसात गेल्या व तक्रार दाखल केली. जरीपटका पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं.
आणि एका संशयित रिक्षाचालकाला अटक केली,विशेष म्हणजे ऑटो नांदेड पासिंग होता,आणि ते सर्व वर्ध्याचे होते. चौकशी नंतर समजले कि ती टोळी ऑटोने नागपूर यायचीव चोरी करून वर्धा परतायची,पोलिसांनी शेख फिरोज नावाच्या चालकाला ताब्यात घेत विचारणा केली आणि सर्व गौडबंगाल समोर आलं.चोरट्यांची ही टोळी महिलाच चालवत होत्या. त्याचं नेतृत्त्व दोन सख्ख्या 'जावा' रंजीता आणि कुमा पात्रे या करत होत्या.
त्यांना साथ देणाऱ्या रिक्षाचालकालाही बेड्या ठोकल्या आहेत.या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.