माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी यांना घेराव आंदोलन केल्यानंतर निवेदन देतांना प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले.
शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराच्या विरोधात संघटनेचे आंदोलन
मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे यश
चंद्रपूर/ प्रतिनिधी
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग व आश्रम शाळांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी घेराव आंदोलन पुकारले. एकाच दिवशी प्राथमिक शिक्षण विभाग ,माध्यमिक शिक्षण विभाग व समाज कल्याण अधिकारी कार्यालय समोर दुपारी दोन ते सलग पाच वाजेपर्यंत घेराव आंदोलन करण्यात आले. या विभागातील भोंगळ कारभारामुळे अनेक पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्रस्त आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने कडक पाऊल उचलले .यामुळे अधिकारी नरमले व 10 फेब्रुवारी पर्यंत प्रलंबित समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या घेराव आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील समस्या तात्काळ दूर करण्याचे लेखी आश्वासन दिले. शिवाय कर्मचाऱ्यांचे एक तारखेला वेतन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व आदिवासी शाळा संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आलेला होता. तिन्ही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या विभागातील प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. लिखित आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात प्रांतिय उपाध्यक्ष एम.डी,धनरे, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कूरेकर, सल्लागार देवराव निब्रड,प्रमोद कोंडलकर, संघटक मनोज वासाडे, आश्रम शाळा विभागाचे पदाधिकारी
दिलीप गोखरे, किशोर नगराळे,सुरेंद्र अडबाले,राजु डाहूले,रवि बनपूरकर,प्रभाकर शेरकी,विठोबा हिंगाणे,भालचंद्र धांडे,पंकज बाराहाते ,सर्व अतिरिक्त शिक्षक व उपस्थित इतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रलंबित समस्या व मागण्यांमध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारीचे वेतन (थकबाकीसह) सातवा आयोगानुसार करण्यात येईल.
सातव्या आयोगात एकस्तर योजना मंजूर करणेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात येईल.
12 वर्ष झालेल्या आश्रमशाळा शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ तात्काळ मंजूर करण्यात येईल.
१ तारखेस वेतन न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केल्या जाईल. श्री नामदेव पवार , शेणगाव यांचे २००६ मध्ये बेकायदेशीर अतिरिक्त ठरवून एक वर्षाचे गोठवलेले वेतन अदा करण्यात येईल.चुकीच्या वेतननिश्चित्या सुधारित करून मंजूर करण्यात येईल.
२०१३ च्या परिपत्रकानुसार शिक्षकेत्तर कर्मचार्यांना वरीष्ठ श्रेणीचा लाभ देण्यात येईल.
भ. नि. निधी प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्यात येईल.सर्व मागण्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे पीडित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.