Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०३, २०२०

वर्धा; शिकवणी वर्गाला जात असताना शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले


शिक्षिकेवर नागपूर येथे उपचार सुरू
हैद्राबाद येथील घटनेची पुनरावृत्ती

प्रमोद पाणबूडे:
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात हैदराबाद येथील घटनेची पुनरावृत्ती झाली असून शहरातील नंदोरी चौकात दोन तरुणांनी दुचाकीने येऊन शाळेत शिकवणीसाठी जात असलेल्या शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.ही घटना सोमवारी सकाळी ७.२० घडली.


यात शिक्षीका गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आरोपी तरुणांचे नाव विकास विवेक नगराळे दरोडा व त्यांचा एक मित्र असे आहे. हे दोन्ही घटनेनंतर फरार झाले.

Image result for hinganghat police station

शिक्षीकाही शहरातील तुळसकर काॅलेज मध्ये शिकविन्यासाठी जाते, हे विकृत मानसिकतेचे दोन तरुण आले व तिच्या सोबत शाब्दिक वाद घालु लागले,त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून आरोपी फरार झाले.
Attempts to burn teacher in wardha, धक्कादायक! वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढिल पोलिस तपास सुरू आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेनंतर वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.