Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ०३, २०२०

वाघ व रानडुक्कर शिकार प्रकरण : ६ आरोपींना न्यायलयीन कोठडी

सावली/चंद्रपूर:
तालुक्यातील कापसी वनविभागच्या जागेवर वाघ व रानडुक्कर च्या शिकार प्रकरणी ६आरोपिंना अटकेनंतर त्यातील सुरेश गेडाम, संजय गेडाम, सुरेश भोयर,अजय मेश्राम, बंडू गेडाम सर्व रा.कापसी या आरोपिंना न्यायलयीन कोठडी सुनावन्यात आली आहे.
Image result for वाघ शिकार
संग्रहित
तरस तेलानगंतुन अटक करण्यात आलेले आरोपी दिलीप भोयर रा. कापसीयाला ३ पर्यंत वन कोठडी सूनवन्यात आली आहे.सावली वनपरिक्षेत्र अंतर्गतअसलेल्या व्याहाड उपक्षेत्रा अंतर्गत सामदा बिटातील कक्षक्रमांक २०१ मध्ये वाघाचा इलेक्ट्रिक विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला.

 सदरचा भाग हा झुडपी जंगलाने व्यापलेला असुन याभागात वन्यजीव रानडुक्कराचा मौठाहौदस असतो, त्यामुळे या भागात डुकराची शिकार करून मांस विकण्याचा गोरखधंदा अनेक हौशी लोकांकडून मोठ्या प्रमाणात केल्याजात आहे. कापसी गावातील चर्चेअंती मिळालेल्या माहितीनुसार वाघाची शिकार झाल्याची महिनाभरापूर्वीची जनमानसात चर्चा असल्याची माहिती पुढे येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.