चंद्रपूर/प्रतिनिधी:
संवादशास्त्र, जनमाध्यम अभ्यासक तथा पत्रकार चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी पंकज मोहरीर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे.
त्यांनी आंतरविज्ञान विद्या शाखेत ‘जनसंवाद' अभ्यासक्रमामध्ये 'राजकपूरने चित्रपट माध्यमातून दिलेल्या सामाजिक संदेशाचे अध्ययन ' या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना पुण्यातील दिवंगत डॉ. डी. के. (राजा) पोखरापुरकर यांनी मार्गदर्शन केले. पंकज मोहरीर यांनी या यशाचे श्रेय आपले आई-वडील व मार्गदर्शकांना दिले आहे.