येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील सायगाव रामवाड़ी येथे शनिवार रोजी जि प प्रा शाळा येथे वार्षिक स्नेहसम्मेलनाचे शाळा व्यवस्थापन समिती व रामवाडी ग्रामस्थ तसेच जि प.प्रा.शाळा रामवाडी शिक्षकवृंद यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी ग्रामस्थ तसेच येवला तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समितीचे शिस्तप्रित सभापती प्रविणभाऊ गायकवाड यांच्या हस्ते दिपप्रजवलन व सरस्वती पूजन व श्रीफळ वाहून करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान येवला तालुक्यातील कार्यकुशल युवा नेते कुणालभाऊ दराडे यांना देण्यात आले
व त्याच बरोबर इतर पाहुणे मंडळींचे स्वागत करण्यात आले
स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुणालभाऊ दराडे यांचा सत्कार शा व्य समिती अध्यक्ष मयूर विजय खैरनार यांनी केला. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण भाऊ गायकवाड यांच्या सत्कार गणपत उशीर यांनी केला त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित राजेंद्र वानखेडे सर,भागूनाथ उशीर,दिनेश आप्पा खैरनार, सुनीलआप्पा देशमुख,विजय खैरनार ,शरद लोहकरे,विजय परदेशी सर,गोरख मछिद्र उशीर,सौ.योगीताताई भालेराव,देविदास जानराव सर,गणपत अण्णा खैरनार आदी मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे तर्फे करण्यात आला.यानंतर गणपत अण्णा खैरनार, श्री. प्राध्यापक शिवाजी भालेराव सर ,श्री कुणाल भाऊ दराडे ,श्री.प्रविणभाऊ गायकवाड यांनी आपले मनोगते सादर केली. व जि प प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली दंडगव्हान मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.*
सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान जि प प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली दंडगव्हान मॅडम व सहशिक्षक श्री नितीन गावित सर यांनी शाळेत राबविलेल्या अभिनव उपक्रमांचे प्रोजेक्टर वरती सादरीकरण केले
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शालेय स्तरावरील आयोजित स्पर्धामध्ये प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..
यानंतर उपक्रमशील शिक्षक म्हणून शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमासाठी जि प प्रा शाळा रामवाडी मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली दंडगव्हान मॅडम व सहशिक्षक श्री नितिन गावित सर यांचाही शा व्य समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शा व्य समिती अध्यक्ष श्री मयूर विजय खैरनार यांचाही सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक काढण्यात आले यावेळी परीक्षक म्हणून प्राध्यापक शिवाजी भालेराव सर,व श्री सुरेश देवरे सर यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली
बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बक्षीस वितरणानंतर श्री नितिन गावित सर यांनी आभार प्रदर्शन केले तसेच अध्यक्ष सुचनेवरून कार्यक्रमाचा समारोप झाला असे जाहीर करण्यातआले सूत्रसंचालन श्री अरुण जानराव व चि अभिजित लक्ष्मण ढाकणे यांनी केले.
कार्यक्रमासाठी रामवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ तसेच रामवाडी ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.