तिला न्याय द्या;विद्यार्थी आणि नागरिकांचा संताप
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
हिंगणघाट येथील तरुणी शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवण्याच्या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंगणघाटच्या नांदोरी चौकात भर दिवसा शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न केला गेला.
हे प्रकरण 24 तासाच्या आत वर्धा पोलिसांनी आरोपीला नागपूर येथील टाकळघाट मधून अटक केली. विकेश नागराळे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेचा सर्वच स्तरावर निषेध होत असून जस्टिस फॉर शी म्हणत हिंगणघाट येथील विद्यार्थी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कठोर कारवाईची मागणी करीत विविध संघटनांनी निवेदन दिले आहे .
हिंगणघाट शहरात चौकात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र संताप पाहायला मिळाला. ठिकठिकाणी निदर्शशने करण्यात आली. हिंगणघाट येथे महाविद्यालयाचे सहकारी शिक्षिका आणि विद्यार्थ्यानी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन कारवाईची मागणी केली आहे. आरोपीला टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले असल्याचेही सांगण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आश्वासनानंतर मोर्चेकरी शांत झालेत,
आरोपी विकेश नगराळे यानें या आधी देखील त्याने बस मध्ये त्याने या आधी त्याने विष प्राशन केले होत.आधी देखील हिंगणघाट बस स्टॉप वर छेडखानी करायचा कधी-कधी तो गावात असलेल्या घराजवळ देखील तो येऊन चकरा मारत राहायचा.तरुणी शिक्षिकेला नागपूर येथे दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.डोळे, नाक ,कान या अवयवावर जखमा झाल्याने प्रकृती चिंताजनक असलयाचे सांगण्यात येत आहे.
दारुडा येथील गावकऱ्यांनी देखील संताप व्यक्त करीत आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. या आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी असे गावातील महिला व पुरुषांनी मत व्यक्त केले आहे. समाजात अशा घटना घडू नये. त्या मुलीवर जे बेतले ते कठीण आहे. समाजातील दृष्टिकोन बदलला पाहिजे असे मत गावातील तरुण विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. महिलांनाही स्वतंत्रपणे जगू द्या अशीच आर्त हाक गावात होती.