Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२०

संत गजानन महाराज हायस्कूल येथे माजी विद्यार्थी मेळावा




निफंद्रा/ प्रतिनिधी
सावली तालुक्यातील संत गजानन महाराज हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पेंढरी (मक्ता) येथे नुकताच माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. डाॅ. विलास पा. गड्डमवार, उद्घाटक मान. दामोधरजी गोबाडे सरपंच मुंडाळा, प्रमुख अतिथी म्हणून मान.लोखंडे सर प्राचार्य इ. गां.वि.पालेबारसा, श्री.सी.डी.उराडे सेवा निवृत्त शिक्षक व एकुण २६ माजी विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतामधून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतिल असे विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. पी. एस. समर्थ तर संचालन श्री. ए. बी. गेडाम व आभार श्री.एन.एस.राखडे स.शी. यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.