Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०४, २०२०

२१, २२ आणि २३ फेब्रुवारीला चंद्रपुरात साहित्य आणि संस्कृती महोत्सव

कविकट्ट्यात सहभागासाठी आवाहन


चंद्रपुर:
-चांदा क्लब चंद्रपूर तर्फे विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या सहयोगाने चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे स्मृती समर्पित तीनदिवसीय राज्यस्तरीय साहित्य व संस्कृती महोत्सव दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२० ला चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आले आहे.

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या महोत्सवाचे उद्घाटन करणार असून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सचिन खेडेकर आणि चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार विशेषत्वाने उपस्थित राहतील. तीनही दिवसाच्या या महोत्सवाचे अध्यक्ष प्रख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक डॉ. रविंद्र शोभणे असतील. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार असतील.

नवोदित कवींना त्यांची कविता सादर करता यावी, त्यांना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवात दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 4 या दरम्यान कविकट्टा आयोजित करण्यात आलेला आहे. 

यात सहभागी होणाऱ्या कवींना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येतील. तरी ज्या कवींना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नोंदणी इरफान शेख यांच्या 9665413821 या क्रमांकवरील व्हाट्सअप्प वर नोंदणी करावी.. कविकट्टयाचे सहभाग शुल्क 100 /- रुपये असून कवींनी आपली नोंदणी 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी.

 त्यांनतर नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन महोत्सवाचे कार्याध्यक्ष डॉ. कीर्तीवर्धन दिक्षित,कार्यवाह सुनील देशपांडे, सहकार्यवाह डॉ. राजीव देवईकर, प्रशांत आर्वे, इरफान शेख, कविकट्टाचे संयोजक विवेक पत्तीवार, स्वप्नील मेश्राम आणि महोत्सवाचे प्रसिद्धीप्रमुख श्याम हेडाऊ यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.