ड्यूटी आटोपुन घरी जात असतांना पैनगंगा कोळसा खाणीतील काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर
अज्ञात इसमांनी हल्ला केला,या हल्यात तो गंभीर जखमी झाला.ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कौशल कुमार ब्रिजेशकुमार (३४) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
कौशल कुमार ब्रिजेशकुमार हे पैनगंगा कोळसा खाणीत सुरक्षा विभागात कार्यरत असून ते दररोज चंद्रपूरवरुन दुचाकीने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे कौशल कुमार कर्तव्य बजावून सोमवारी सायंकाळी दुचाकीने घरी जात होते. दरम्यान एसीसीच्या मागील बाजूनी त्याना तीन इसमांनी अडवून कोळसाची गाडी का सोडली नाही,
असे म्हणत लोखंडी रोडने त्यांच्या हातावर वार केला.
व कौशल कुमार यांनी पळ काढला,याबाबतची
तक्रार पोलीस ठाण्यात केली .
पोलिसांनी कलम १४७, १४८, ९४९,
३२४, 3४१, ४२७, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपासकरीत आहे. कौशल कुमारवर वेकोलिच्या राजीव रतन दवाखान्यात उपचार सुरु आहे.
wcl कर्मचारी यांचेवर याआधिदेखिल असे गंभीर मारहाण झाली आहे.मात्र मैनेजर सारखे वरिष्ठ अधिकारी है हल्ले रोखण्यासाठी काही प्रयत्न करीत नसल्याचे म्हटल्या जाते. त्यामुळे खाणीत काम करावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.