विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे आंदोलन
नागपूर - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी आज (दि. 18) विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते.
यात शासनाने 13 फेब्रुवारी 2013 पासुन कार्यरत शिक्षकांना टिईटि परीक्षा सक्तीची केलेली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक अश्या 12 हजार शिक्षकांच्या नोकरीवर गदा आलेली आहे. 30 जुन 2016 पर्यंत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना टी ई टी ची जाचक अट रद्द करून सेवा संरक्षण देण्यात यावे, राज्य शासनाने 31 आक्टोबर 2005 रोजी अध्यादेश काढून जुनी पेन्शन योजना रद्द करुन अंशदाय पेन्शन योजना सुरू केली. ही अन्यायकारक योजना असुन आतापर्यंत जवळपास 3000 डिसीपीएस कर्मचारी मृत्यू पावले असुन त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून या योजनेंतर्गत कुठलाही लाभ देण्यात आलेला नाही. कर्मचार्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारी अंशदाय पेन्शन योजना रद्द करून 2005 नंतर नियुक्त कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी, शिक्षकांना प्रती विद्यार्थी अनुदान देण्याबाबत गठीत करण्यात आलेला अभ्यासगट तात्काळ रद्द करावा, शिक्षकांना तात्काळ आश्वासित प्रगती योजना (10,20,30) लागू करावी, विना अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांना टीईटी अट रद्द करावी, संच मान्यतेत झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त कराव्यात, वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असलेली प्रशिक्षणाची अट तात्काळ रद्द करावी, शिक्षणाधिकारी व वेतन पथक कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावी, पटसंख्येच्या मुद्यानुसार 20 विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात यावी, कायम विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ विद्यालय अनुदानित आणन्याकरीता निकषांची अट शिथिल करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करावी या मागण्यांच्या समावेश होता.
शिक्षकांचा हा मोर्चा अंत्यत शिस्तबद्ध रितीने असल्यामुळे लक्षवेधी ठरला यावेळी विविध मान्यवरांनी शिक्षकांच्या प्रश्नावर मनोगत व्यक्त करून शिक्षणाचे मारक धोरण हे बहुजन विरोधी कसे आहे हे सांगितले.
मोर्चाचे नेतृत्व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, समिर काळे, रविकांत गेडाम, अमोल राठोड, मेघा ढोरे, सुरेश धारणे यांनी केले.
या मोर्चात मिलिंद वानखेडे, राजेंद्र खंडाईत, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, समिर काळे, रविकांत गेडाम, महेश गिरी, डॉ. जयंत जांभुळकर, प्रकाश भोयर, दिनेश गेटमे, राजू हारगुडे, अमोल राठोड, दिपक कोंबाडे, मेघा ढोरे, गौरव दातीर, सौ. प्रणाली रंगारी, सौ पुष्पा बढिये, भिमराव शिंदेमेश्राम, प्रेरणा हिरेखन, रिना कावळे, अंकुश कडू, नेहा मौदेकर, प्रफूल देवतळे, गजानन भोरड, नामा जाधव, विजय काळे, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.