Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २१, २०२०

महावितरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यावर गुन्हा दाखल

vij khamb mentance साठी इमेज परिणाम
वीज खांबावरून खाली उतरण्यास अडथळा आणला

नागपूर/प्रतिनिधी:
थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्याने चिडलेल्या ग्राहकाने महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. महावितरणच्या पथकाला धक्काबुक्की केली म्हणून वीज ग्राहकाच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाल, किल्ला परिसरातील मो. अयुब खान सुजाद खान या वीज ग्राहकाने मागील एक वर्षांपासून वीज देयकाची रक्कम भरली नव्हती. या वीज ग्राहकाकडे १ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी झाली होती. महावितरणकडून थकबाकीची रक्कम वसूल व्हावी यासाठी सतत पाठपुरावा सुरु होता. पण वीज ग्राहक मो. अयुब खान सुजाद खान दाद देत नव्हता. महावितरणकडून थकबाकीची रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस अगोदर वाजवण्यात आली होती. आज महावितरणचे तुळशीबाग उप विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव, शुक्रवारी शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता मनिष वाकडे, तंत्रज्ञ मनीषा बोरकर, राकेश शिवणकर, दिलीप वैद्य, वसंत रामटेके, योगेंद्र मेश्राम, देवराव राहाटे हे किल्ला परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकबाकीची रक्कम वसूल करीत होते.
nutrikraft साठी इमेज परिणाम
 महावितरणकडून थकबाकीदार वीज ग्राहक मो. अयुब खान सुजाद खान याचा वीज पुरवठा खंडित केल्यावर रशीद खान आणि अन्य एका व्यक्तीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वीज खांबावर चढलेल्या राकेश शिवणकर यांनाही वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी दबाव टाकू लागला. खाली उतरण्यास अडथळा निर्माण केला. या घटनेचे छायाचित्रण करण्यासही रशीद खान याने आडकाठी आणली.

वीज ग्राहकाच्या या कृत्याविरोधात महावितरणकडून कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी वीज ग्राहकाच्या विरोधात भादंवि ३५३,३३२,५०४, ५०६,३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.