चांदा ते बांदा योजनेतून जोडधंद्यांना
चालना देण्याचे काम सुरू राहील
पालकमंत्री वडेट्टीवार यांची ग्वाही
नंदोरी (चंद्रपूर ):
चांदा ते बांदा योजनेतून दुग्ध व्यवसाय शेळीपालन मत्स्यव्यवसाय कौशल्य विकासावर आधारित उद्योग एकूणच शेतकऱ्यांच्या कृषी विषयक कामाला चालना येणाऱ्या अनेक जोड धंद्यांना चालना मिळत आहे त्यामुळे ही योजना यापुढेही सुरू ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नंदुरी येथे केले.
नंदोरी येथे आयोजित जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनी मध्ये आलेल्या शेतकऱ्यांची संवाद साधताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली याठिकाणी जोड धंद्यामध्ये दुग्ध विषयावर यांनी उत्कृष्ट काम केले अशा पशुपालकांची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती चांदा ते बांदा हे अभियान सध्या जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना दुधाचा व दुधाची अनुषंगिक व्यवसायामध्ये जम बसविण्यासाठी मदत केली जात आहे. तसेच शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, आदी व्यवसायाला देखील मदत केली जात आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांकडे केली.
त्यामुळे ही योजना बंद होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले. उलट या योजनेची व्याप्ती वाढून प्रत्येक तालुक्याला याचा मोठ्या प्रमाणात लाभ ,मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले