मेट्रो ट्रेनला बँक ऑफ महाराष्ट्रच्या जाहिरातीचे आवरण
नागपूर ३० : ऑरेंज लाईन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु करण्यात आली असून नुकतेच अँक्वा लाईन मार्गीकेवर देखील यशस्वीपणे प्रवासी महा मेट्रोने सुरु केली आहे. यातच महत्वाचा आणखी एक घटक म्हणून महा मेट्रोने बँक ऑफ महाराष्ट्रचे ट्रेन रॅपिंगचे अँडव्हर्टायझिंग मिळवले आहे. या अंतर्गत मेट्रो ट्रेनला बँक ऑफ महाराष्ट्रच्या जाहिरातीचे आवरण बसवण्यात आले आहे. ण
नॉन फेयर बॉक्सच्या माध्यमाने ट्रेन रॅपिंगद्वारे महसूल मिळविण्याचा जागतिक पर्याय
या जाहिरातीच्या निमित्ताने महा मेट्रो आणि बॅंकेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारामुळे दरमाह १ लाख रुपयांचे उत्पन्न महा मेट्रोचे होणार आहे. हा संपूर्ण सामंजस्य करार १२ महिन्याच्या कालावधीकरिता करण्यात आला असून या कराराअंतर्गत १ मेट्रो ट्रेनच्या ३ कोचला आवरणाच्या द्वारे जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहे.
या आवरणाच्या माध्यमाने बँक ऑफ महाराष्ट्राचे विविध उपक्रम दर्शविण्यात आले आहे. यावरणाचा खर्च रुपये ४.९५ लाख असून हा खर्च बँक ऑफ महाराष्ट्रने अदा केला आहे. नॉन फेयर बॉक्सच्या संकल्पनेमध्ये हा मोठा उपक्रम आहे.
महत्वपूर्ण म्हणजे महा मेट्रोने ५०% महसूल हा नॉन फेयर बॉक्सच्या माध्यमाने अर्जित करण्याचा महत्वकांक्षी लक्ष निर्धारित केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सोबत करण्यात आले सामंजस्य करार हा प्रारंभिक एक वर्षाकरीता आहे. याशिवाय महा मेट्रोला प्रॉपर्टी डेव्हलपमेंटच्या माध्यमाने विविध कंपनी आणि संस्था कडून इंस्टीटयुट ऑफ इंजिनियर्स, लोकमान्य नगर, जय प्रकाश नगर,खापरी,एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध असेलल्या व्यावसायिक जागेवरुन देखील महसूल मिळतो आहे.
महा मेट्रोने नेहमीच नॉन फेयर बॉक्सवर लक्ष केंद्रित केले असून स्टॅम्प ड्युटी, टीओडी पॉलिसी, पीडी आणि स्टेशन नेमींग राइटस अश्या विविध योजनाचा या मध्ये समावेश आहे. तसेच ७ मार्च २०१९ रोजी पासून सुरु झालेल्या प्रवासी सेवा आधीच महा मेट्रो ने रु. १५० कोटी नॉन फेयर बॉक्सच्या माध्यमाने महसूल मिळविला होता. भविष्यातील गरजा बघता महा मेट्रोने नॉन फेयर बॉक्स फक्त नियोजन केले नसून प्रत्यक्ष आवश्यकतेनुसार अंबलबजावणी देखील करीत आहे.