सामाजिक कार्यकर्ते संदिप आराखडे यांनी राबवला अनोखा उपक्रम
येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला: महाराष्ट्र शासनाचा राज्यातील सर्व प्राथमिक शाळेत सुरू केलेला वॉटरबेल हा उपक्रम येवला तालुक्यातील शिवाजीनगर(तळवाडे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आला,परंतुबहुसंख्य विध्यार्थी गरीब आदिवासी असल्याने सर्व मुलांना वॉटरबॉटल उपलब्ध नसल्याने बेल वाजल्याबरोबर विध्यार्थ्यांना पाणी प्यायला वर्गाच्या बाहेर जावे लागे, नुकतेच सामाजिक कार्यकर्ते संदीप आराखडे यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यानिमित्त इतर खर्चाला फाटा देत शाळेतील विध्यार्थ्यांसाठी काहीतरी देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा शिक्षकांनी वॉटरबेल कार्यक्रमासाठी वॉटरबॉटलची आवश्यकता असल्याचे सांगितले.तेव्हा लगेच मान्य करत त्यांनी दोन दिवसात विध्यार्थ्यांना बॉटल उपलब्ध करुन दिल्या.यावेळी कार्यक्रमास संदीप आराखडे सोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख अखबर शेख तसेच गणेश घोडसरे,विलास बांगर,रवींद्र आरखडे इत्यादी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख शेख यांनी राज्यशासनाचा वॉटरबेलहा उपक्रम तालुक्यात गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे,सायगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवला जात असल्याचे सांगत भारम केंद्रात पण चोख अंमलबजावनी होत असल्याचे सांगितले तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप आरखडे दातृत्वाचे कौतुक केले आहे.