प्राचार्य डाॅ.सुरेश बाकरे
नवरगाव - कोणत्याही काळात महाविद्यालयात सकारात्मक बदल करावयाचे असतील. महाविद्यालयाचे आधिक आधिक अद्यावतीकरण करायचे असतील तर माजी विद्यार्थ्यांनी नक्कीच महाविद्यालयाला निसंकोचपणे महाविद्यालयास सूचना कराव्या,महाविद्यालयाच्या विकासात या सूचना महत्वाच्या ठरतात.आमच्या मर्यादाही सांगाव्या.माजी विद्यार्थी या नात्याने श्री ज्ञानेश महाविद्यालयात कधीही यावे आपले स्वागत आहे.आपण महाविद्यालयात एकत्र येऊन कोणताही उपक्रम राबवावा महाविद्यालय तुमच्या सोबत आहे"
असे आवाहान त्यांनी यावेळी केले.
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नोंदनीकृत माजीविद्यार्थी संघटणेची नोंदनी केली आहे.दरवर्षी १७ जानेवारी रोजी माजी विद्यार्थी एकत्र येऊन चर्चाविमर्श करतात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर यादव हे होते.
अध्यक्षीय भाषण करताना यादव म्हणाले "श्री ज्ञानेश महाविद्यालय हे संस्कार विद्यापीठ आहे.माझ्या जीवनात अनेक कठीन प्रसंगी लढण्याचे बळ या मातीतून मिळाले.मी खूप संघर्ष करुन शिकलो. त्यावेळी हे महाविद्यालयातील आम्हा गोरगरीब विद्यार्थ्यांचे आधारस्थंभ व मार्गदर्शक होते.अनेक प्राध्यापकांनी माझ्या सारख्यांना घडवले" अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी विविधक्षेत्रातील मान्यवर अनेक माजी विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.माजी जि.प.सदस्य कल्पनाताई बोरकर यांनी "या महाविद्यालयातून माझ्यासारखे नेतृत्व उभे राहिले.जीवनात खूप प्रेरणा या महाविद्यालयाने दिली" अशी भावना व्यक्त केली.प्रा.इंदीरा खोब्रागडे यांनी "मी भाजी विकणार्या कुंटुबातील होते.या महाविद्यालयात शिकताना मीही काम करुन शिकले.पण स्वाभिमानाने जगण्याची दिशा मला इथून मिळाली" आपली मनोगते व्यक्त केली. अमोल निनावेे याने महाविद्यालयाचे हे संघटन सामाजिक उपक्रमासाठी खूले असावे,व्यसनमुक्तीसाठी आजी विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम राबवण्याचा मानस त्याने व्यक्त केले. शशांक बोरकर यानी कृतज्ञता व्यक्त करताना महावाद्यालयाने माझ्या शिक्षकी पेशातील प्रावासापासून तर पदव्युत्तर इंग्रजी करतानाही खूप मदत झाल्याची भावना व्यक्त केली. आशीष राचलवार यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे दर वर्षी पारिवारीक गेटटुगेदर घ्यावे ही सूचना केली.संजय नैताम या सैनिक असलेलेल्या माजी विद्यार्थ्यांने महाविद्यालयात NCC हा उपक्रम राबवण्याची सूचना केली. बोरकर ,राजेश सहारे या विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय या संघटनेचे सचिव डाॅ.संजय नाकाडे यांनी केले तर सुत्रसंचालन अविनाश गुरुनुले यांनी केले. प्रा. प्रविण गीरडकर यांनी आभार मानले.