जुन्नर/आनंद कांबळे
मतिमंद/दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे नंदनवनचे संस्थापक विकास घोगरे यांना प्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक तर्फे स्व. रजनीताई लिमये स्मृती पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ मतिमंद/दिव्याग बांधवांसाठी नाशिक मध्ये काम करणाऱ्या स्व. रजनीताई लिमये यांच्या नावाने दिव्यांग क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
या वर्षीचा 2020 चा हा पुरस्कार माय ऍक्टिव्हिटी सेंटर , संचालित नंदनवन या संस्थेचे संस्थापक विकास घोगरे व त्यांच्या पत्नी आश्विनी घोगरे यांना महेंद्रा कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.
हा कार्यक्रम नाशिक येथील परशुराम सायखेडेकर सभागृहात संपन्न झाला.
यावेळी प्रबोधिनी ट्रस्टच्या अध्यक्ष ढवळे, रजनीताई लिमये यांची कन्या अंजली हटंगडी व संस्थेचे विविध पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
जुन्नर शहराच्या बाजूला खानापूर या गावी माय ऍक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बावीस मतिमंद दिव्यांग बांधवांचे पुनर्वसनाचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे.
मतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विकास घोगरे व त्यांच्या पत्नी सौ अश्विनी घोगरे हे दाम्पत्य व तसेच संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष सौ रुपाली बोकरिया खजिनदार पंकज कर्पे, फकीर आतर, सुभाष मोहरे, सुभाष शिंदे हा सेवकामाचा भाग म्हणून निस्वार्थ सेवा सर्व टीम अहोरात्र गेल्या सात वर्षांपासून काम करत आहेत .
या मुलांमध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा सामाजिक जनजागृती व्हावी या अनुषंगाने हे नांदनवांची टीम काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रबोधिनी ट्रस्ट यांनी हा पुरस्कार त्यांना 16 जानेवारी 2020 रोजी प्रदान करण्यात आला.