नागपूर/प्रतिनिधी:
हैद्राबाद व उन्नाव येथील घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच नागपूरजवळच्या कळमेश्वरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी अशीच एक घटना रविवारी उघडकीस आली. तोंडात कापड कोंबून पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नंतर दगडाने डोके ठेचून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, कळमेश्वरमध्ये तणावाचे वातावरण आहे.या प्रकरणात आरोपी संजय देवराव पुरी राहणार सावंगी मोहगाव हल्ली मुक्काम लिंगा याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी हा मद्यपी होता आणि मागील दोन महिन्यांपासून हा मुलीच्या प्रत्तेक हालचालीवर त्याची नजर होती त्यानंतर त्याने मुलीशी संपर्क वाढवायला सुरुवात केली. तो मुलीला कधी चॉकलेट तर कधी तुरीच्या शेंगा द्यायला लागला. त्यामुळे संजयची मुलीसोबत चांगली ओळख झाली. शुक्रवारी मुलगी शाळेतून घरी आली. आजोबाकडे जात असल्याचे सांगून ती घरून निघाली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आजोबाकडून परत घरी जात होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ती आजोबांकडून घरी जाण्यासाठी निघाली. मात्र, घरी पोहोचली नाही. रात्र होऊनही ती घरी न आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. ती आढळली नाही. नातेवाइकांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.तुरीच्या शेंगा देण्याच्या बहाण्याने संजय हा तिला शेतात घेऊन गेला.
तोंडात कापड कोंबले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी आपले नाव सांगेल, अशा भीतीने संजयने दगडाने डोके ठेचून मुलीची हत्या केली. शेतातीलच झुडपात तिचा मृतदेह लपवून ठेवला. त्यानंतर तो घरी गेला. पुन्हा दारू प्यायली. रक्ताने माखलेले कपडे घरी लपवून तो शेजाऱ्याकडे गेला व जेवण करून चिंतेत झोप घेतली.
सकाळ झाली अन रविवार उजळला सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना नागपुरातील संजय भारती यांच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती . तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्याचे दिसून आले . या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांनी पोलिसांविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. तणाव निर्माण झाला.
नागपूर कळमेश्वरजवळ लिंगा गावात 5 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नागरिकांनी कळमेश्वर बंद पुकारला |
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक मोनिका राऊत आदींसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम संजय पुरी याला अटक केली आहे. तो शेतमजुरी करतो. दारू पिऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.पोलिसांनी अत्याचार, खून, अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून संजयला अटक केली. या अत्याचार व हत्याकांडाचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविला जाणार आहे. त्यादृष्टीने कळमेश्वर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. लवकरात लवकर प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
नागरिकांनी पोलिसांविरोधात घोषणात देत काळे झेंडे दाखविले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कशीबशी गावकऱ्यांची समजूत घातली.मुलीच्या हत्येनंतर संतप्त गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घातला. 'मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, नराधमाला फाशी द्या', अशा आशयाची फलके गावकऱ्यांच्या हातात होती. शेकडो गावकरी जमल्याने तणाव निर्माण झाला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक कळमेश्वर येथे मागविण्यात आली.
सर्वोत्कृष्ट पोल्ट्रीफीड उपलब्ध |