चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांदाच प्रशासकीय सेवेत रुजू झालेले विकास खारगे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त झाले. त्यांनी आपल्या पदाच कारभार स्वीकारला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना वृक्षारोपण कार्यक्रम तसेच वनसंवर्धन, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, ग्रीन आर्मी असे उपक्रम त्यांचे चर्चेचे विषय राहिले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांनी विविध पदांवर त्यांनी कामं केली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे सहायक जिल्हाधिकारी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी केली.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विकास खरगे हे मुख्यमंत्री कार्यालयात सचिव होते. त्यानंतर 2014 नंतर खरगे यांनी प्रधान सचिव वनविभाग या पदावरही काम केलं. वन खात्याचे सचिव ते मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव म्हणून थेट नियुक्त होणारे खरगे हे दुसरे सचिव आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आपले प्रधान सचिव म्हणून IAS अधिकारी विकास खरगे यांची नियुक्ती केलीय. अतिशय हुशार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर भुषण गगणराणी यांचीही मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.