नागपूर/प्रतिनिधी:
दोघीही रात्रंदिवस अभ्यास करायला लागल्या. दोघींना एकाच ठिकाणावरून नोकरीसाठी बोलावण्यात आले. मात्र एकीला नोकरी मिळाली. दोघींनीही सारखीच मेहनत घेतल्यानंतरही केवळ मैत्रिणीला जॉब मिळाला.मात्र तिला मिळाला नाही अन तिने आत्महत्या केली. ही घटना नागपुरातील गणेशपेठ परिसरात उघडकीस आली. डोडो ऊर्फ पौर्णिमा राजू सांगोरे (वय 22, रा. पंचशील नगर, भद्रावती) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
पौर्णिमा हिला नर्सिग महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तीन वर्षांचा कोर्स करीत असतानाच तिची क्लासमेट मेघा करणदास मेश्राम (वय 22, लालापेठ कॉलनी, चंद्रपूर) हिच्याशी भेट झाली.दोघींनीही सोबतच शिक्षण,राहणे,अभ्यास,करीत पदवी पूर्ण केली. दोघींनीही एकाच ठिकाणी नौकरीसाठी इंटरव्यूसाठी गेले..त्याच ठिकाणहून नोकरीसाठी बोलावण्यात आले. मात्र एकीला नोकरी मिळाली. अन पौर्णिमा नैराश्यात गेली. मागील आठ दिवसांपासून तणावात गेली. मैत्रीण रोज टापटीपपणे नोकरीवर जाऊ लागली तर ती घरात बसून तणाव सहन करीत होती. शेवटी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणीला सकाळी मैत्रीणीला ड्युटीवर जाऊ दिले आणि तिने घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविली. या दोघीही दीड वर्षापूर्वी नागपुरात आल्या होत्या. त्यांनी गणेशपेठमधील गंजीपेठ, पाटीलपुरा परिसरातील किरायाने रूम घेतली होती.