- वर्धा मार्गावर मेट्रोचे सहावे स्टेशनही झाले सुरु
नागपूर, २० नोव्हेंबर २०१९- वर्धा मार्गावरील रिच-१ (सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन आज बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर पासून प्रवासी सेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. आज पहिल्यांदा सकाळी ८ वाजता सीताबर्डी इंटरचेंज येथून खापरीच्या दिशेने जाणारी मेट्रो ८.१७ वाजता जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनवर थांबली. दरम्यान या भागातील काही नागरिकांनी तिकीट काढून खापरी जाण्यासाठी मेट्रोने प्रवासही केला. पहिल्यांदा या स्टेशनवरून प्रवास करत असल्याचा आनंद प्रवाश्यांमध्ये होता.
जयप्रकाश नगर स्टेशनवरून खापरीला जाण्यासाठी सकाळी ८.१७, ८.४७, ९.१७, ९.४७, १०.१७, १०.४७, ११.१७, ११.४७ दुपारी १२.१७, १२.४७, १३.१७, १३.४७, १४.१७, १४.४७, १५.१७, १५.४७ आणि सायंकाळी १६.१७, १६.४७, १७.१७, १७.४७, १८.१७, १८.४७, १९.१७ तसेच या स्टेशनवरून सीताबर्डीला जाण्यासाठी ८.२३, ८.५३, ९.२३, ९.५३, १०.२३, १०.५३, ११.२३, ११.५३ दुपारी १२.२३, १२.५३, १३.२३, १३.५३, १४.२३, १४.५३, १५.२३, १५.५३ आणि सायंकाळी १६.२३, १६.५३, १७.२३, १७.५३, १८.२३, १८.५३, १९.२३, १९.५३, २०.२३ वाजता मेट्रो उपलब्ध राहणार असल्याची नोंद प्रवाश्यांनी घ्यावी.
सध्या वर्धा मार्गावर (रिच-२) खापरी, न्यू एयरपोर्ट, साऊथ एयरपोर्ट, एयरपोर्ट आणि आता जयप्रकाश नगर स्टेशन सुरु झाल्याने खामला, स्नेहनगर, स्वराज नगर इ. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सीताबर्डी किंवा खापरीकडे जाण्यासाठी मेट्रोने प्रवास करने सोयीस्कर ठरेल. तसेच खाजगी हॉटेल्स, ववसायिक दुकाने इत्यादीने व्यापलेला असल्यामुळे नागरिकांना या स्टेशनवरून मेट्रोचा लाभ घेता येईल. प्रवाश्यांच्या दृष्टीने आवश्यक जसे लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगांसाठी प्लॅटफॉर्मवर मार्किंग, स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्था इ. सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.