प्रशिक्षणार्थीची सुरक्षा ऐरणीवर
चंद्रपूर/प्रतिनिधी
स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ) चंद्रपुर येथील आदिवासी प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी करिता असलेले आदिवासी वसतिगृहाची सुरक्षा भिंत मागील एक महिन्यापासून पडल्यामुळे तेथे राहत असलेल्या प्रशिक्षणार्थी मुलींची सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे.मात्र वसतिगृह प्रशासन ने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशिक्षणार्थी मुली मध्ये भीती चे वातावरण आहे.
नेहमीच चर्चेत राहणारे स्थानिक मुलींची आय टी आय परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या बाहेरगाव चे आदिवासी प्रवर्गातील मुलींकरिता राहण्याची व्यवस्था आहे . या वसतिगृहाची प्रवेश क्षमता ही 50 आहे। परंतु तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा ह्या अत्यंत तोडक्या आहेत। मुलींना झोपायला पलंगाची संख्या कमी आहे , बेड नाही . एका खोली मध्ये 4 ते 5 मुली राहत असून त्यान्हा एक ते दोन पलंग उपलब्ध करून देण्यात आले आहे। महापालिका प्रशासन द्वारे पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाणी पुरवठा बंद असल्यास त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. जरी नावाने आदिवासी च्या नावाने वसतिगृह आहे परंतु सर्व कामकाज हे आय टी आय प्रशासन द्वारे चालविल्या जाते. परंतु सदर प्रशासन कडून दुर्लक्षित होत असल्याने तेथे सोयी सुविधांची वानवा आहे।
आता पुन्हा वसतिगृहाची सुरक्षा भिंत पडल्याने तेथे राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेची बाब पुढे आली आहे.
स्वेच्छा निधी कागदावर
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत किरकोळ बांधकाम दुरुस्ती, विद्युतीकरण, रंगरंगोटी , सांडपाणी वाहणाऱ्या नाली, अंतर्गत रस्ते इत्यादी किरकोळ कामे ही स्वेच्छानिधी प्रस्ताव मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारे करण्यात येते मात्र आय टी आय संस्था प्रमुख व सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अभियंता ,ठेकेदार यांचेशी संगनमत करून सदर स्वेच्छा निधी मध्ये लाखो रुपयांचा अफरातफर केला जात आहे. किरकोळ सिव्हील बांधकाम व विद्युतीकरण करताना मंजूर अंदाजपत्रक नुसार कामे केली जात नसून आय.टी.आय. संस्था प्रमुख हे चिरिमीरी घेऊन काम न करता उपोयोगीता प्रमानपत्र देऊन अंदाजपत्रका नुसार कामाचे देयके काढत आहेत याबाबत चौकशी करून संबंधित संस्था प्रमुख वर कार्यवाही करण्यात ची मागणी संचालनालय मुंबई चे नवनियुक्त संचालक यांचे कडे केली आहे.