- दलित महिला सरपंच अपमान प्रकरण चिघळले
- निषेध मोर्चा व धरना आंदोलनात हजारो नागरिक सामील
खापरखेडा-प्रतिनिधीमागील काही दिवसांपासून स्टार शहर बस सेवा उदघाटन चांगलेच गाजत असून राजकारण तापले असून सिल्लेवाडा ग्रामपंचायतच्या दलित महिला सरपंच यांचा अपमान झाल्यामुळे सदर प्रकरण चिघळले घटनेच्या पाचव्या दिवशी निषेध मोर्चा व धरना आंदोलन आ सुनील केदार यांच्या नेतृत्वात 17 सप्टेंबर मंगळवारला करण्यात आले याप्रसंगी आ सुनील केदार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवून महिलांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू महिलांच्या आत्म- सन्मानासाठी लढतांना गुन्हे काय दाखल करता फाशीची शिक्षा जरी दिली तरी मागे पुढे पाहणार नाही असा घणाघात केला यावेळी शेकडो महिलांसह हजारो नागरिक सामील झाले होते अण्णामोड चौकातून दुपारी 12 च्या सुमारास काळ्या फिती लावून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली दलित महिला सरपंचाचा अपमान करणाऱ्या तथाकथित नेत्याला त्वरित अटक करा, टाळ्या वाजविणाऱ्या नेत्यांवर कार्यवाही करा, शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या नेत्यांवर कार्यवाही करा आदि घोषणा देण्यात आल्या धरने आंदोलन मुख्य बाजारपेठेत करण्यात आले यावेळी झालेल्या जाहीर सभेत मंचावर आ सुनील केदार यांच्यासह सरपंच प्रमिला बागडे,बसपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना ढोरे,माजी जि. प. सदस्य तापेश्वर वैद्य, शांता कुमरे, दयाराम भोयर,माजी उपसभापती आशिष उपासे,सरपंच रवींद्र चिखले,लईक अन्सारी, पुरुषोत्तम चांदेकर,वंदना ढगे,उपसरपंच अर्चना ठवरे,मधुकर दुगाने, प्रियंका उपासे,सामाजिक कार्यकर्ता उदय महाजन, माजी सरपंच प्रकाश खापरे,धनराज डेहरिया,सविता भड,वंदना बेले,अरुणा शिंदे, सुरेखा शिंदे,रिंकू सिंग,विजय वासनिक,सतीश ढोके,सतीश सिंदूरकर,रेखा ढोके,योगेश ठाकरे,विवेक खन्नाडे, गौरखेडे, संगीता गजभिये आदि उपस्थित होते यावेळी प्रस्ताविकपर भाषणात प्रकाश खापरे यांनी सिल्लेवाडा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रमिला बागडे ह्या बसपाच्या कार्यकर्त्या असून सरपंच म्हणून त्या जनतेतून थेट निवडून आल्या आहेत मात्र भाजपचे झेंडे लगाओ अभियाना दरम्यान झालेल्या जाहीर सभेत सार्वजनिक ठिकणी सरपंच बागडे यांना उद्देशून ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी अश्लील भाष्य केले तंबाखे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर केला याप्रसंगी मंचावर उपस्थित भाजपा नेत्यांनी टाळ्या वाजवून तंबाखे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले भाजपाची संस्कृती महिलांचा सन्मान करणारी असल्याचे नेते ठासून सांगतात मात्र एका दलित महिलांचा अपमान होत असताना टाळ्या वाजविणाऱ्या नेत्यांना कोणती उपमा द्यावी हे समजण्या पलीकडे आहे सदर कृत्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे त्यामुळे संपूर्ण समाज बांधव जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले यावेळी मंचावर उपस्थित अनेक नेत्यांनी अश्लील भाष्य व टाळ्या वाजविण्याऱ्या नेत्यांचा निषेध करून खरपूस समाचार घेतला निषेध मोर्चाला उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांना संबोधित करतांना आ सुनील केदार म्हणाले राज्यात भाजप मित्र पक्षाची सत्ता आहे सर्व सामान्य जनतेला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे मात्र एका दलित सरपंच महिलेचा सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दांचा वापर करून तिचा अपमान करने हे भाजपच्या संस्कृतीला मान्य आहे का? सरपंच बागडे यांचा अपमान होत असताना मंचावर बसलेली जिल्ह्यातील भाजपची सुसंस्कृत मंडळीकडून समज देण्यात आली नाही उलट टाळ्या वाजवून समर्थन करण्यात आले माझ्या मतदार संघात महिलांचा अपमान कधीही सहन करणार नाही मग त्या कोणत्याही पक्षाच्या असो महिलांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही महिलांच्या आत्म सन्मानासाठी गुन्हे दाखल काय करता महिलांचे आत्मसन्मान करने माझे प्रथम कर्तव्य आहे फाशी झाली तरी चालेल असे केदार यांनी आवर्जून सांगितले येत्या दहा दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा आम्हीच त्याचा शोध लावून पोलिसांच्या हवाली करणार असल्याचे केदार म्हणाले यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी सरपंच बागडे यांच्याकडून निवेदन स्वीकारले शासकीय कामात अडथळे निर्माण करण्याऱ्या व टाळ्या वाजविणाऱ्या नेत्यांवर कायदेशीर कार्यवाही करा व महिलांचा अपमान करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली एका दलित महिलेच्या सन्मानासाठी आ सुनील केदार यांनी न्यायाची भूमिका घेतल्यामुळे जाहीर सभेतून सरपंच बागडे यांनी आभार मानले कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता कोणतीही अनुचित घटना घडली नाही.