Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १७, २०१९

दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीप्रकरणी अटक


तडीपारीची कारवाई करा - पारोमिता गोस्वामी यांची मागणी 

चंद्रपूर/प्रतिनिधी -
 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीप्रकरणी रामनगर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्या चारचाकी वाहनातून 35 विदेशी दारूच्या पेट्या सापडल्या आहेत.

दीपक जयस्वाल हे सराईत दारू तस्कर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होण्याच्या पूर्वीपासून अवैध दारु व्यवसायात असल्याने त्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले आहे. जैस्वाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, आपल्या राजकीय वाल्याचा वापर ते अवैध व्यवसायासाठी करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियान च्या संयोजीका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ट्विटरद्वारे ही मागणी केली आहे.
दीपक जयस्वाल हे लीकर असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने सुरुवातीपासून त्यांनी दारूबंदीच्या विरोधात भूमिका घेतली यानंतरही त्यांनी जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा कसा करता येईल यासाठी प्रयत्न करित आहे. उल्लेखनीय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना तिथे दारु तस्करी असताना करताना गोंडपिपरी पोलिसांनी त्यांना पकडले होते व अटक केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातूनही काढले होते.
एकीकडे स्वतः अवैध दारूचा पुरवठा करायचा आणि दुसरीकडे दारूबंदी फसली म्हणून सर्वत्र प्रचार करायचा अशी भूमिका जयस्वाल घेत आहे. जयस्वाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे ते राजकीय दबाव टाकून अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहेत आणि जिल्ह्यातील दारूबंदीला छेद देण्याचा प्रयत्न करीत असल्याने शासनाने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटरद्वारे केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.