नागपूर/प्रतिनिधी:
आंतरराष्ट्रीय योग्य दीना निमित्य महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग साधना करून सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. महावितरणच्या बिजली नगर येथील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात योग प्रशिक्षक मुकुल गुरु यांनी उपस्थितांकडून योगासने करून घेतली.
यावेळी अधिकारी- कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले जी, आरोग्य चांगले असावे म्हणून आपण व्यायाम करतो. पण, शरिरासोबतच मनाच्या आरोग्यासाठी योग करणे खूप आवश्यक आहे. योग केल्याने मनाला आणि शरिराला खूप फायदा होतो. योगाच्या द्वारे शरीर तर निरामय होतेच, त्याखेरीज स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता, मनोबल यांचा विकास साधता येतो.
कार्यक्रमास महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारीप्रादेशिक संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता(गुणवत्ता नियंत्रण)सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके, उप महाव्यस्थापक (माहिती तंत्रज्ञान)प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, राजेंद्र गिरी, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)वैभव थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले. महावितरण कला व क्रीडा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.