तृतीयपंथींच्या रॅम्पवाकने जिंकले चंद्रपूरकरांची मने
80 स्पर्धकांनी घेतला सहभाग
चंद्रपूर/प्रतिनिधी:
सक्षम समाज घडवीण्यासाठी समाजील दूर्लक्षीत घटकाला विकासाच्या मुख्य प्रवासात आणने गरजचे असून असे आयोजन समाजामील दुर्लक्षीत घटकांसाठी उत्तम व्यासपीठ आहे. अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन यापूढे आयोजीत करा शक्य ती मदत आम्ही करु अशी ग्वाही यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांनी दिली. टच वुड व यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फॅशन शो स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तृतीयपंथी यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नितीन पुगलीया, डी.एस.के गृप, आदित्य चौधरी, असमा उपरे, एकता भैया आदिंची मूख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, प्राण्यांवर प्रेम करण्याचा माणसाचा स्वभाव आहे. मात्र हाच समाज याच समाजातील तृतीयपंथ यांना हिन भावनेतून पाहत असेल तर हे चुकीचे असून मानवी संस्कृतीला न शोभनारे आहे. तृतीयपंथी हे सुध्दा या समाजातील घटक आहे. मात्र समाजाने त्यांना अद्यापही स्विकारलेले दिसत नाही. त्यामूळे समाजात वावरतांना त्यांना अणेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या प्रती समाजाची तिरस्कृत भावणा आता समाजाने बदलवायला हवी. त्यांच्यातही कला गुणांची कमी नाही. त्यामूळे त्या कलागुणांना योग्य व्यसपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यात यंग चांदा ब्रिगेट सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही या प्रसंगी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी दिली. या आयोजनाने समाजापूढे एक आदर्श निर्माण केला आहे. हे स्वतामध्येच एक अणोखे आयोजन असून तृतीयपंथी यांनीही यात सक्रिय सहभाग दर्शवत त्यांच्यात असलेल्या कलागुणांचे प्रदर्शन करज ते सुध्दा याच समाजाचे घटक असल्याचे त्यांनी समाजाला दर्शवीले आहे. असेही याप्रसंगी जोरगेवार म्हणाले तसेच या प्रसंगी तृतीयपंथी यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या त्या सोडवण्याच्या दिशेने काम करण्याचे आश्वासण दिले. मीस्टर गृप मध्ये मोहीत हिरानी, मिस गृप मध्ये श्रृती हागे तर मिसेस या गृपमध्ये प्रियंका जडागी यांनी प्रथम पुरस्कार पटकीवला.
यावेळी टच वूड गृपचे अध्यक्ष निखील आसवानी, अश्विनी तोमर, यांच्यासह टचवूड च्या सदस्यांची व चंद्रपूर करांची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मल्लारप, नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, हर्षद कानमपल्लीवार, राजू जोशी, पंकज चिमूरकर, सौरभ ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.