नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणची मान्सुमपुर्व तयारी आणि देखभाल व दुरुस्ती या विषयावरील महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिलेल्या मुलाखतीचे प्रसारण आकाशवाणीच्या नागपूर ‘अ’ केंद्रावरून शनिवार दि. 22 जून 2019 रोजी सकाळी 9.17 ते 9.30 या वेळेत होणार आहे.
आकाशवाणी नागपूरच्या ‘अ’ केंद्रावरील (मध्यम लहरी) प्रसारीत होणा-या ‘दृष्टीक्षेप’ या कार्यक्रमा अंतर्गत दिलीप घुगल यांची ही मुलाखात प्रसारीत होणार असून यात वादळी वा-यासह पडणा-या मुसळधार पावसात वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणने केलेली पुर्वतयारी, याकाळात करण्यात येणारी उपाययोजना, वीज वितरण कंपनी आणि ग्राहकांनी या काळात घ्यावयाची दक्षता आदी विषयांवर ते विस्तृत माहिती देणार आहेत.