Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ०२, २०१९

अंगणात झोपलेल्या 9 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेले जंगलात आणि मग...

नागपूर/ललित लांजेवार:

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नऊ महिन्याच्या चिमुकल्याला बिबट्याने झोपेतून उचलून नेऊन जंगलात ठार मारल्याची घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास घडली. 

सतीश दादाजी गुरनुले यांच्या परिवारातील सर्व जण रात्रीच्या सुमारास बाहेर अंगणात झोपले होते. 

मात्र बीबट्याने आई सोबत झोपलेल्या 9 महिन्याच्या बाळाला तोंडात उचलून जंगलाकडे नेले. या बालकाचा आरडाओरड झाला आणि सर्वजण खडबडून जागे झाले असता प्रकार सर्वांच्या कानावर आला.

यानंतर जंगलाकडे धाव घेतली असता बिबट्याने बाळाचा रक्ताचा घोट घेऊन सोडून दिले होते. त्याच सोबत डावा पाय सुद्धा तोडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
 फॅशन डिझाईनिंग कोर्सेस,प्रवेश देणे सुरू,वरील
दिलेल्या नंबरवर संपर्क करा, आणि त्वरित प्रवेश घ्या
 पोल्ट्रीफीड उपलब्ध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.