व्याहाड परिसरातील शिवमंदिर शिवारातील घटना
नागपूर : अरूण कराळे
नागपूर तालुक्यातील व्याहाड (पेठ) शिवमंदिर परिसरात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर पाच पुरुष गंभीर जखमी झाले. सोमवार २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
गिरीष संभाजी पोहरकर वय ३२ वर्ष राहणार सिर्शी बेला ता.उमरेड हल्ली मुक्काम व्याहाड (पेठ) ता.जि.नागपूर असे मृतकाचे नाव आहे. जखमी खुशाल रामभाऊ बेलखेडे वय ३८ वर्ष , परवेश गुलजार पठाण वय ४५ वर्ष , गजेंद्र छन्नुलाल भलावी वय ३५ वर्ष , विजय नागोराव क्षिरसागर वय ४० वर्ष , ईकबाल अजिज शेख वय २६ वर्ष हे सर्व राहणार व्याहाड (पेठ) ता.जि.नागपूर हे सर्व जण वासुदेव पिसे यांंच्या शेतात कामा करण्याकरीता गेले .
दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे आकाशात ढग जमा झाले .आणि पावसाची एक जोरदार सर आली. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी विज वाऱ्यासह जोराचा पाऊस पडत असल्याने शेतातील झाडाखाली बसले होते. काही कळण्याच्या आत त्याच झाडावर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत एक ठार झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती व्याहाड(पेठ) परिसरात कळताच बघ्याची गर्दी वाढू लागली. मिळेल त्या वाहनाने व्याहाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहीती हिंगणा पोलिस ठाण्यात देण्यात आली.
हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्थिव उत्तरीय तपासणीकरीता व शवविच्छेदनासाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यातआले. तर गंभीर जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.सोनाली बाके, डॉ.सत्यवान वैद्य यांनी प्रथमोपचार करुन वाहनचालक रामक्रिष्णा टापरे आपल्या १०२ रुग्णवाहीकेने नागपूर मेडिकल रुग्णालयात रेफर करण्यात आले. व पुन्हा १०८ रुग्णवाहीकेने गंभीर रुग्णांना नागपूर मेडिकल येथे रवाना करण्यात आले.
याप्रसंगी कोविड-१९ यौध्दा सुनिल कापसे, दिनकर वाईकर, तूषार सरोदे, रामदास वाकडे, जिवन तागडे यांनी रुग्णांची मदत केली . घटनास्थळावर जि.प.शिक्षण सभापती भारती पाटील व सरपंच विठोबा काळे आरोग्य केंद्रात दाखल झाले. व रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे आश्वासन दिले .
पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक सारीन दुर्गे यांंच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक विनोद नरवडे सह अन्य पोलिस कर्मचारी करीत आहे.
मृतक गिरीष सभांजी पोहरकर हा युवक सिर्शी-बेला ता.उमरेड येथील रहीवासी असून हा काम धंदा करण्याकरीता बहीण व जावई यांंचा सहारा घेतला होता . त्याला पत्नी,एक दोन वर्षाचा मुलगा असून व्याहाड (पेठ) येथे रामभाऊ यांचे कडे भाड्याने राहत होता . मृतक हा टिनूप लॉजिस्टीक पार्क चौदामैल येथे कार्यरत आहे.