डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद ची मागणी
नागपूर - विनाअनुदानित शाळेवर काम करत असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागपूर विभागणी अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी केली.
संजय निंबाळकर यांनी म्हटले की, संचारबंदीमध्ये सर्व घटक आर्थिक तंगी मध्ये आले आहे,काही असेच हाल विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहे,या शिक्षक कर्मचाऱ्यांना विनाअनुदानित शाळेत वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा संपल्यावर बाहेर काम करून आपल्या परिवाराचे पोट भरते, परंतु आता संचारबंदी असल्यामुळे सदर शिक्षक बाहेर काम करू शकत नाही,ते आर्थिकदृष्ट्या तंगीत आले आहे,त्यामुळे आपल्या कुटूंबियाची पोटाची खडगी बुजविण्याचे मोठे संकट या शिक्षक कर्मचाऱ्यांना आले आहे,
शासनाने विनाअनुदानित तुकड्याना अनुदान देणाच्या निर्णय घेतला आहे,परंतू वेतन मिळणास भरपूर वेळ लागणार आहे ,आता मात्र या शिक्षक कर्मचाऱ्यांना उपासमारीची पाळी त्यांच्यावर आली आहे,त्यामुळे शासनाने काही प्रमाणात या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थीक मदत करावी ,अशी मागणी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी केली आहे.