धर्मेंद्रकुमार पंडित यांचे योगदान
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर होणार कीटची मदत
चंद्रपुर/प्रतिनिधी:
२४ तास वैद्यकीय सेवा देणारे चंद्रपूर महानगरपालिकेचे डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचे आरोग्य जपले जावे या हेतूने प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीरिंग असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष श्री.धर्मेंद्रकुमार पंडित यांनी २७ एप्रिल रोजी ११ पीपीई ( पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट ) कीट चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांना सुपुर्त केल्या.
करोनाबाधितांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्या रुग्णाच्या उपचारादरम्यान या पीपीई कीट अत्यंत उपयोगी असतात. पीपीई किटमुळे संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळते. कोरोनापासून बचावासाठी या कीट अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. आरोग्याच्या कामानिमित्त नागरीकांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, विशेषतः कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे यांना पीपीई सूटची अत्यंत आवश्यकता असते.
जगात जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. कोरोनाचा विळखा सर्वच देशात अधिक घट्ट होत जातोय. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी चिंताजनक होऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या, विविध तंत्रज्ञानयुक्त असलेल्या देशांनीही कोरोनापुढे हात टेकले आहेत. त्यामुळे हा विषाणू किती महाभयंकर असेल याची प्रत्येकाला आतापर्यंत जाणीव झालीच असेल. त्यामुळे या विषाणूविरोधात लढायचं असेल तर आपल्यालाही तेवढ्याच वैद्यकीय सक्षमतेने पुढे यायला हवं. लोकांमध्ये हा आजार पसरू नये याकरता सातत्याने जनजागृती सुरू आहे. मात्र जे आरोग्य सेवक रुग्णांविरोधात लढतात त्यांना सोई सुविधा मिळणे गरजेचे असल्याने धर्मेंद्रकुमार पंडित यांचे योगदान महत्वाचे आहे.
पीपीई किट म्हणजे काय?
पीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा उपकरण. वैयक्तिक सुरक्षा उपकरण (पीपीई) हे असं उपकरण आहे ज्यात एखाद्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण मिळते. हे उपकरण आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना दिलं जातं.
काय काय असतं पीपीई किटमध्ये?
हातमोजे, पायमोजे, मास्क, गाऊन, डोक्याचं संरक्षण करण्यासाठी कव्हर, रेस्पिरेटर्स, डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी साधन, फेस शिल्ड आणि गॉगल आदी सर्व वस्तू पीपीई किटमध्ये असतात.