देसाईगंज तालुक्यातील तुळशी कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मागील ३५ वर्षापासून अविरत सुरू असलेल्या उपक्रमातून दिल्या जाणाऱ्या नि:शुल्क दमा औषधीचे वितरण ८ जून २०१९ शनिवारी मृग नक्षत्राच्या पर्वावर होणार आहे. वैद्यराज प्रल्हाद कावळे हे महाराष्ट्र आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश यासह कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दमा रूग्णांना मासोळीतून औषध देणार आहेत. सदर औषध घेण्यासाठी दमा रूग्णांची ८ जूनला कोकडी येथे प्रचंड गर्दी होणार आहे.
यंदा ८ जून २०१९ ला संध्याकाळी ६ वाजून ०९ मिनिटांनी मृग नक्षत्र मुहूर्तावर संध्याकाळी औषध वितरणाला सुरुवात होणार असून ९ जून २०१९ सकाळी ६ वाजेपर्यंत हे औषध वितरण करण्यात येणार आहे.
वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या मार्गदर्शनात औषधी देण्यात येणार असून प्रल्हाद कावळे यांचा सेवाभावी उपक्रम मागील ३८ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.रुग्ण औषधी घेण्यासाठी दोन किमीची रांग लावतात व लाखो लोक हि औषधी घेण्यासाठी शेकडो किमीचा अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्यात येत असतात ,या दिवशी तुळसी कोकडीला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
संग्रहित छायाचित्र |
हि औषधी मांसाहारी दमा रुग्णांना गणी भुरभुसा या बारीक मासोळ्यांतून आयुर्वेदिक औषध दिली जाते. ही औषध सतत तीन वर्ष एकदाच सेवन केल्याने रुग्णांना कायम स्वरुपी लाभ मिळत असल्याचे सांगण्यात येत असल्याने या औषधीचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह विदेशी रुग्णही कोकडीकडे वळू लागल्याने दरवर्षी येणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मासोळीतून औषध देताना मासोळ्यांचा तुटवडा जाणवू नये याकरिता स्थानिक भोई, ढिवर, केवट समाज बांधवांसह परिसरातील बांधवांचे विषेश सहकार्य घेण्यात येते. उन्हाचा तडाखा लक्षात घेता तालुका आरोग्य विभागा यंत्रणाही सुसज्ज करण्यात आली आहे.
महत्वाची सुचना
किमती दागिने घालून येणे टाळा
मोबाईल पर्स चोरांपासुन सावध
कोणाच्याही घरी औषधी पिऊ नका.
औषधीसाठी कोणालाही रुपये देऊ नका.
वडसा ते कोकडी वाहतूक दर १५ रुपये
किंवा २०रुपया पेक्षा अधिक देऊ नका
गावात,शाळा परिसरात,रस्त्यावर घाण करू नका
प्लास्टिक उरले जेवण इ.चा योग्य विल्हेवाट लावा
औषधी संपत नाही, त्यामुळे अती घाई टाळा
अफवांवर विश्वास ठेऊ नका
आपला जोडिदार,साथिदार,लहान मुलांशी योग्य संपर्क ठेवा
औषधी गर्भवती महिलांनी घेऊ नये
औषधी मासोळीतून दिली जाते
कोकडीचे प्रल्हाद हे काही वर्षांपूर्वी दमा बिमारीने ग्रस्त होते. त्यांनी उपचारासाठी अनेक गावे फिरली बिमारी न गेल्याने कावळे यांनी मासोळीतून औषध खाण्याचा प्रयोग स्वतःवर केला त्यातून त्यांचा दमा आजार बरा झाला. तेव्हापासून गेल्या ३४ वर्षांपासून मृग नक्षत्राच्या दिवशी दरवर्षी भूरभूरा व गणी या प्रजातींच्या मासोळीतून दमा या आजारांच्या रुग्णांना हि औषध देतात. या औषधाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी उच्चांक गाठत असून यावर्षी सुद्धा लाखो दमा रुग्नांनी औषधींचा लाभ घेण्यासाठी कोकडीत येतात,स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने लाखो लोक सुरक्षित याठीकानाहून औषधी घेऊन परतात. अशी माहिती वैद्यराज प्रल्हाद कावळे यांचे पुत्र टीकाराम कावळे यांनी खबरबातशी बोलतांना दिली.
या ठिकाणी अनेक सेवाभावी संस्था आपली अविरहित सेवा देत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा ताफा लावण्यात येतो. औषधीसाठी येणाऱ्या रुग्णाची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळातर्फे अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येतात. गेल्या 34 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते ,लोकप्रतिनिधी,सामाजिक संघटना व नागरिक या सेवाभावी उपक्रमात महत्वपूर्ण योगदान देत आहेत.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध;करा वरील नंबरवर संपर्क |