Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २३, २०१९

पाचगाव येथील सबस्टेशनला आग:जीवितहानी टळली

चांपा/प्रतिनिधी:

उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील ३२ केव्हीच्या सबस्टेशनच्या परिसरात मंगळवारी ४:३२वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची  घटना घडली, पाचगाव सबस्टेशनला   आग लागताच पाचगावात  एकच कल्लोळ माजला. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सबस्टेशनच्या दिशेने धाव घेतली. पाहता पाहता अख्खे पाचगावाचे  नागरिक या केंद्राच्या आवाराजवळ उभे झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. यामुळे पाचगावासह आसपासच्या गावातील वीज पुरवठा काही काळाकरिता खंडित करण्यात आला होता.

नागपुर ते उमरेड महामार्गावरुन पाचगाव सब स्टेशनला आग लागल्याचे दिसत होते. एवढे मोठे लोळ कशाचे, असे भाव पाचगाव वासीयांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हे लोळ कशाचे पाहण्याकरिता सारेच सब स्टेशनच्या  दिशेने धावू लागले. नागरिकांचा वाढता लोंढा व कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी प्रमोद राऊत यांना पाचगाव सब स्टेशनला आग लागल्याचे माहिती मिळताच तत्काळ पोलीस सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक भोयर , पवन सावरकर घटनास्थळी दाखल झाले .पाचगाव सबस्टेशन ला शॉर्ट सर्किट झाल्याचे श्याम डडमवार व गार्ड दिलीप गायकवाड यांच्या लक्षात आले , श्याम डडमवार व दिलीप गायकवाड यांच्या सतर्कतेने मोठी जीवित हानी टळली ,  श्याम डडमवार हे पाचगाव सब स्टेशनचे ऑपरेटर आहेत .

सोबत डी .जी .पारवे , गार्ड दिलीप गायकवाड सब स्टेशनच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे दिसताच घटनास्थळी पाणी घेऊन पोहचले .पाचगाव सबस्टेशनच्या ट्रान्सफॉर्मर च्या शॉर्ट सर्किट मुळे सब स्टेशनच्या मागच्या परिसरात झाडेझुडपात आग लागल्याने मेहता कंपनी चे काही कर्मचारी धावून आले पाणी टाकून आगीवर नियंत्रण करीत होते , आग वरील नियंत्रण सुटल्याने श्याम डडमवार यांनी तत्काळ पाचगाव सबस्टेशन च्या परिसरात आग लागली या घटनेची महिती उमरेड येथील महावितरणचे अभियंता राऊत यांना घटनेची महिती मिळतातच  उमरेड येथील अग्निशामकच्या कर्मचाऱ्याला पाचगाव ला सब स्टेशनला आग लागली तत्काळ उमरेड येथील पाचगाव येथील घटनास्थळी पोहचले व अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. आग आटोक्यात येईपर्यंत सबस्टेशन पासून मेहता कंपनी पर्यंतच्या भागात काळोख होता.

आग आटोक्यात आल्यानंतर  महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाचगाव व चांपा परिसर येथील केंद्रावरून पाचगाव करिता विजेची उपलब्धता करून दिली. तसेच या केंद्रातून पाचगाव जात असलेला वीज पुरवठा पाचगाव येथील केंद्रावरून सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली.

आगीवर नियंत्रणाकरिता अग्निशमन दलाची धावपळ 
पाचगाव सब स्टेशन च्या परिसरात आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता  उमरेड  येथील  अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.