जनमताचा कौल मान्य
विजय वडेट्टीवार यांनी मानले जनतेचे आभार
नागपूर ललित लांजेवार:
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील बाळू धानोरकर यांनी देशाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे,
शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा दणदणीत पराभव करत बाळू धानोरकर संपूर्ण महाराष्ट्रात सबका मलिक बनले आहेत.
मतमोजणी सुरु असतांना हंसराज अहिर हे आघाडीवर होते,तब्बल दीड तास अहिर हे धानोरकर यांच्या पेक्षा समोर होते मात्र उन्हाचा पारा जसा जसा चढत होता तस तसा अहिर हे पिछाडीवर आले,आता परियंत मिळालेल्या माहितीच्या आधारे बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे ४४७६३ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहे.बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना ५५९५०७इतके मत मिळाली तर तर प्रतिस्पर्धी हंसराज अहिर यांना ५१४७४४ तर वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांना ११२०७९ दारांच्या मते चंद्रपूरच्या या लढतीकडे जरी तिहेरी लढत म्हणून बघितल्या जात असले तरी मात्र प्रत्यक्षात हि दुहेरी लढतच होती.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला असतांना मात्र बाळू धानोरकर यांनी कॉंग्रेसची महाराष्ट्रात लाज राखली.
बाळू धानोरकर हे संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणारे एकमेव उमेदवार आहेत.
बाळू धानोरकर मूळचे काँग्रेसी नसून लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेना आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. निवडणूक लढवीत असतांना धानोरकारांसमोर तगडे आव्हाने म्हणजे सलग धानोरकर यांच्यासमोर भाजपकडूनही तगडं आव्हान उभं होतं. १९९६, २००४, २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत विजयी झालेलं हंसराज अहिर यांच्या रूपाने, निवडणुकिआधी चंद्रपुरात चांगलेच धानोरकर आणि अहिर यांच्यात चांगलेच घमासान बघायला मिळाले होते,चंद्रपूरकरांना दारूवाला पाहिजे कि दुधवाला यावरून चांगलीच चर्चा व घमासान रंगले होते.
हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र, अखेर बाळू धानोरकर यांचा विजय झाला.
मतमोजणी सुरु असतांना हंसराज अहिर आणि बाळू धानोरकर हे दोघेही एकाच सोप्यावर बसून दिसले होते,त्यांनी एकाच (पिवळ्या) रंगाचे कपडे देखेल परिधान केले होते, या दोघांचा हा फोटो सोशल मीडियात हे दोघेही चांगलेच त्रोल झाले.
निकालाचा दिवस गुरुवार असल्याने बरेच उमेदवारांनी पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण केली होती. तसे केल्याने हा दिवस फलदायी ठरतो असे मानले जाते.
निकाला पूर्वी हंसराज अहिर हे तिरुपती व माता महाकालीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते,मात्र मतदारांनी दिलेला कौल हा धानोरकरांकडे गेला.राज्यात फक्त काँग्रेसला एकच जागा मिळाली आणि ती बाळू धानोरकर यांच्या रुपाने. त्यामुळे मूळच्या काँग्रेसी उमेदवाराने नव्हे, पण शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने काँग्रेसची राज्यात लाज राखली, हे निश्चित.
जनमताचा कौल मान्य
निवडणुकीचा निकाल आम्ही नम्रतपूर्वक स्वीकार करतो. या निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आणि सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने अथक परिश्रमाने ही निवडणूक लढलेले आहि. काँग्रेस पार्टी नेहमीच देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम केले आहे. काँग्रेस पार्टी नेहमीच विचारधारेला घेऊन काम करीत अली आहे. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो. घटना आणि लोकशाही टिकावी यासाठी आम्ही लढत राहू.
या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणारे कार्यकर्ते व काँग्रेस पार्टीवर विश्वास दर्शविण्याऱ्या लाखो मतदारांचे आभार व्यक्त करतो.
कॉंग्रेसमध्ये असणारी गटबाजी हि ऐन निवडणुकीच्या तोंडावर डोक वर काढू लागली होती,अश्यातच पहिले विशाल मुत्तेमवार,नंतर विनायक बांगडे,यांना तिकीट मिळाली.कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण व कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर बांगडेची उमेदवारी रद्द करून विजय वडेट्टीवार यांनी मुंबई दिल्ली वाऱ्या करून सुरेश धानोरकर यांना कॉंग्रेसची तिकीट मिळवून दिली,धानोरकर यांना हि उमेदवारी मिळवून देण्यात आ. विजय वडेट्टीवार यांचा मोठा हात होता.वडेट्टीवार यांनी धानोरकरांसाठी मोठी रणनीती आखली होती.आणि वडेट्टीवार व काही बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांच्या बळावर हि "काटे कि टक्कर" लढविली,आणि निवडणूकित बाळू धानोरकरानसोबत विजय वडेट्टीवारांचा देखील मोठा विजय झाल्याचे दिसते आहे.