Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २६, २०१९

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बाळू धानोरकर यांचा सत्कार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image may contain: 9 people, people standing, crowd, food and indoor
 लोकसभा निवडणुकित काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे विजयी झाल्याने चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी मनपा समोरील गांधी चौकात सत्कार करण्यात आला. 

प्रारंभी ऐतिहासिक जटपुरा गेट येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमला माल्यार्पण करून जटपुरा गेट ते गांधी चौकपर्यंत ढोलताशाच्या गजरात विजय मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मिरवणुकीची सांगता गांधी चौक झाली. आमदार विजय वडेट्टीवार ,अध्यक्ष नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, डॉ.सतीश वारजूरकर, राजेंद्र वैद्य, सुभाष गौर, सुनीता लोढीया, दिनेश चौस्थारे, महेश मेंढे, ऑड. शाकीर, हरीश कोत्तावार, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, अनु दहेगावकर, येथी उईके, घनश्याम मुलचंदाणी,बिनोद दत्तात्रय, पाजी आमदार सुदर्शन निमकर,डॉ. आसावरी देवतळे, ज्योती रंगारी, अश्विनी खोब्रागडे, सोहेल शेख, शफी अहमद, विजय चहारे, अनिल वासेकर, राजू कक्कड, संतोष लहापमगे, ब्लाक अध्यक्ष निखोल धनवलकर, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका संगीता भोयर, संगीता अमृतकर, शालिनी भगत, सुनीता अग्रवाल, हरिदास लांडे, अब्दुल करीम शेख, वंदना भागवत, शालिनी भगत व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.