Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २६, २०१९

सावली तालुक्यात धान व मका खरेदी केंद्र सुरू करा

भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
सावली/प्रतिनिधी:

तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी धान व मका पिकांचे उत्पादन घेत आहेत परंतु तो माल विक्रीकरीता शासकीय खरेदी विक्री केंद्र तालुक्यात नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, खाजगी व्यापारी माल खरेदी करताना कवडीमोल भावाने खरेदी करून लुटमार करत आहेत, 

ती लुट थांबावी व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून सावली भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नाम. सुधिरभाऊ मुनगंटीवार याची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली, पालकमंत्र्यांनी धान व मका शासकीय खरेदी विक्री केद्र सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिका-यांना आवश्यक ती कार्यवाही करावी व केंद्र सुरू करावे असे निर्देश दिले, यावेळी अर्जुन भोयर, अरुण पाल व तुळशीदास भुरसे उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.